गोंदिया, 29 मार्च (हिं.स.)। गोंदिया जिल्ह्याच्या चिचगड वनपरीक्षेत्रातील, मलकाझरी राखीव वनात गस्ती दरम्यान वाघाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत क्षेत्रीय कर्मचा-यांना दिसून आला. सदरचे ठिकाण गावापासून दुर्गम क्षेत्रात डोंगराळ भागात आढळून आले.
घटनास्थळी वनविभागाची टीम पोहचत पंचनामा केला असता दोन वाघांच्या झुंजीत एकाचा मृत्यू झाला असावा असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. तर वाघ पाच ते सहा दिवसांपुर्वी मृत पावला असल्याने वाघाचा स्वविच्छेदन करून जाळण्यात आले आहे.