गोंदिया, 6 एप्रिल (हिं.स.)।
गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील वडेगाव येथील आर्यन प्रमोद शहारे वय वर्ष 14 हा मुलगा गावाजवळून जाणाऱ्या इटियाडोह धरणाच्या मुख्य कालव्यात मित्रासह अंघोळीला गेला असता तो त्या कालव्याच्या प्रवाहात वाहून गेला. सोबत असलेल्या मित्रांनी त्याला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला मात्र त्यांना त्यात यश आले नाही. अखेर दुसऱ्या दिवशी त्याचा मृतदेह कालव्यात आढळून आला. आंघोळ करणे जिवावर बेतले बेतले असुन त्याच्या मृत्युने घरच्या लोकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.