अमरावती, 5 एप्रिल (हिं.स.)। कारमधून गांजा तस्करी करणाऱ्या पाच जणांना गुन्हे शाखेच्या युनिट ने अटक केली. या कारवाईत ४०.३५ किलो गांजा, कार, मोबाइल व रोख असा एकूण १३ लाख ५२ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अटक करण्यात आलेल्या आरोर्पीमध्ये तीन तरुर्णीचा समावेश आहे. ही कारवाई शुक्रवारी दुपारी नांदगाव पेठ ठाण्याच्या हद्दीतील वाळकी मार्गावर करण्यात आली.
सै. रशीद सै. जमशिद (३५), अरफाक दानिश शब्बीर पटेल (२३, दोघेही रा. जुनी वस्ती, बडनेरा) या दोघांसह १९ ते २२ वयोगटातील तीन तरुर्णीना अटक करण्यात आली. नांदगाव पेठ टोल नाक्याकडून वाळकी गावाकडे जाणाऱ्या मार्गाने काळ्या रंगाच्या कारमधून दोन पुरुष व तीन महिला गांजाची तस्करी करत असल्याची माहितीगस्तीवर असलेल्या गुन्हे शाखेच्या युनिट दोनला मिळाली. या माहितीच्या आधारावर वाळकी मार्गावर नाकाबंदी करून ही कार थांबवण्यात आली.
त्यावेळी कारमध्ये सै. राशिद, अरफाक दानिश, तीन तरुणी असे पाच जण बसून होते. कारची झडती घेतल्यावर त्यात ४०.३५ किलो गांजा आढळून आला. त्यानुसार गुन्हे शाखेच्या युनिट दोनने पाचही आरोपींना अटक करून त्यांच्याकडून ८ लाख ६ हजार ६०० रुपये किमतीचा गांजा, दोन मोबाइल, ५ लाख रुपये किमतीची कार व २३ हजार ५०० रुपये रोख असा एकूण १३ लाख ५२ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपीविरुद्ध नांदगाव पेठ ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई गुन्हे शाखेच्या युनिट दोनचे पोलिस निरीक्षक बाबाराव अवचार यांच्या नेतृत्वात सहायक पोलिस निरीक्षक महेशकुमार इंगोले यांच्या सह पथकाने केली.