सोलापूर, 29 मार्च (हिं.स.) : फेब्रुवारी महिन्यापासूनच उन्हाच्या तीव्रतेत वाढ होण्यास सुरवात झाली. मार्च महिन्यामध्ये उन्हाचा तडाखा सर्वांनाच अस्वस्थ करीत आहे. उष्णतेचा परिणाम दुधाळ जनावरांनाही होत आहे. त्याचा दूध उत्पादनावर होणाऱ्या परिणामासह जनावरांच्या आरोग्यावरही होत आहे. भूक मंदावणे, अशक्तपणा अशा प्रकारचे त्रास होताना दिसत आहेत.
त्यामुळे शेतकऱ्यांनी जनावरांची काळजी घेण्याची गरज आहे. वातावरणातील धोकादायक बदलामुळे व वाढलेल्या उष्णतेमुळे अनेक गाई, म्हशींच्या दुधात घट जाणवत आहे. वाढलेल्या उष्णतेचा पाळीव प्राण्यांवर प्राण्यांना त्रास होत होऊ लागला आहे. म्हशीमध्ये उष्णतेची कमी प्रतिकारशक्ती असते. त्याचा परिणाम दुधावर होऊ लागला आहे तर प्रजनन क्षमतेवरही विपरीत परिणाम होत आहे. दूध देणाऱ्या दुधाळ गाई, म्हशी यांना थंड वातावरण लागते. मात्र जनावरे सतत उन्हात असल्यामुळे या उन्हाचा त्यांच्यावर परिणाम होत आहे.
—————