Guruwar Che Upay: हिंदु धर्मात प्रत्येक दिवस महत्वाचा आहे. गुरुवार हा भगवान विष्णू (Lord Vishnu) आणि देव गुरु बृहस्पती यांना समर्पित आहे. या दिवशी भगवान विष्णूच्या पूजेसह व्रत (Lord Vishnu Pooja Vidhi) केला जातो. ज्योतीश शास्त्रानुसार, कुंडलीत (Kundali Dosh Upay) गुरु ग्रह बलवान असल्यास सुख, समृद्धी आणि संपत्तीची कमतरता भासत नाही. कुंडलीतील दोष तसेच बृहस्पति देवाची कृपा लाभण्यासाठी गुरुवारी काही खास वस्तूंचे दान (Thursday Upay) केले पाहीजे. हा उपाय केल्याने कामात येणारे अडथळे दूर होत नशिबाची साथ मिळेल. चला तर मग जाणून घेऊया गुरुवारी कोणत्या वस्तूंचे दान करावे या विषयी माहिती.
गुरुवारी करा या वस्तूंचे दान
तांदूळ, साखर आणि दूध
तुम्ही प्रामाणिकपणे मेहनत करत आहात मात्र, तरीही तुमच्या कामात सतत अडथळे येत असतील तर गुरुवारी भगवान विष्णूची विधीवत पूजा करा. हिंदू धर्मात दान करण्याला महत्त्व आहे. त्यानुसार गुरुवारी गरजूंना तांदूळ, साखर आणि दूध दान करावे. असे करणे शुभ मानले जाते. यामुळे भगवान विष्णू प्रसन्न होत कृपा करतात. यासह शक्य असल्यास किमान 12 गुरुवार व्रत करावा. व्रताच्या दिवशी केळी दान करा पण स्वतः केळी खाऊ नका.
पिवळे कपडे
पिवळा रंग भगवान विष्णू आणि देवगुरु बृहस्पती यांना प्रिय आहे. त्यानुसार गुरुवारी पिवळे कपडे किंवा पिवळ्या वस्तू गरजूला दान करावे. असे केल्याने रखडलेली कामे मार्गी लागतात. गुरुवार हा भगवान विष्णूला समर्पित असल्याने या दिवशी भगवान विष्णूला तुळशीचे पाने आणि पिवळे फुले अर्पण करून भगवान विष्णूची पूजा करावी. यासह पिवळे चंदन, हरभरा डाळ, पिवळी फळे व फुले, पिवळी मिठाई, सुकी द्राक्षे, मक्याचे पीठ आणि हळद यांचे दान करावे. असे करणे शुभ मानले जाते. यासह केवडा आणि केसर इत्यादी दान केल्याने इच्छित फळ मिळते.
(टीप – हा लेख सामान्य माहितीवर आधारित आहे. muktaivarta.com याचे समर्थन करत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांशी संपर्क साधा.)