पुणे, 24 मार्च (हिं.स.)।महापालिकेत २६ हजार कोटी रुपयांचा केबल डक्ट घोटाळा करण्यात आला आहे. या भ्रष्टाचाराबाबत पुणे महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांना अवगत करूनही त्यांच्याकडून कारवाई केली जात नसल्यामुळे राष्ट्रवादी कॉँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस सुनील माने यांनी पोलिस सहआयुक्त रंजनकुमार यांना निवेदन देऊन, दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली.
‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनात मुंबईतील ओव्हरहेड केबल व डक्टविषयी निवेदन करताना कंपन्यांकडून महापालिकेत खोदाई आणि पुनर्स्थापना शुल्क नियमानुसार घ्यावे, असे सांगितले आहे. मात्र, पुणे महापालिकेने या भूमिकेच्या उलट निर्णय घेतला असून, त्यामुळे महापालिकेलेचे २४ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे,’ असा आरोप माने यांनी केला.