Muktainagar News : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन तसेच गृहमंत्री ना.देवेंद्र फडणवीस (Deputy CM Devendra Fadnavis) यांनी व्हिडियो कॉन्फरन्सद्वारे (VC) जळगाव जिल्हा प्रशासन आणि लोक प्रतिनिधी यांचेकडून जळगाव जिल्ह्यातील भुसावळ व सावदा परिसरात बसलेल्या सौम्य भूकंपाच्या धक्के (Bhusawal Earthquake Upadate) याबाबत सविस्तर माहिती घेतली.तसेच जिल्ह्यातील इतर विकास कामे व प्रशासनिक कामाचा आढावा घेतला या बैठकीत मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील (MLA Chandrakant Bhau Patil) यांनी व्हि.सी द्वारे चर्चेत सहभाग नोंदवून मतदार संघातील शेती रस्ते यावर निधी ची तरतूद तसेच शेतकरी वर्गाला दिलासा देण्यासाठी शेत शिवारातील रोहित्र तसेच विजेच्या कामांसाठी जिल्हा नियोजन मध्ये निधी वाढवून मिळावा आणि सोबतच आदिशक्ती मुक्ताई (Adishakti Muktai) हे तिर्थक्षेत्र श्रद्धेचा विषय असल्याने तिर्थक्षेत्र संत मुक्ताई समाधी स्थळ (कोथळी) मुक्ताईनगर येथे रखडलेल्या कामासाठी वाढीव निधी उपलब्ध करून देणे व मुक्ताईनगर शहरात सी सी टी व्ही कॅमेरे बसवून यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून निधी उपलब्ध करणे व इतर असंख्य विषयांवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेशी चर्चा केली.
यावेळी बैठकीत जळगाव जिल्हा पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील, आमदार तथा जिल्हा दूध संघ चेअरमन मंगेश चव्हाण तसेच जिल्हाधिकारी अमन मित्तल, जिल्हा नियोजन अधिकारी प्रताप पाटील तसेच इतर सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुख्यत्वे मागणी करताना सांगीतले की, मुक्ताईनगर मतदार संघ हा तीन तालुक्यांचा एकत्रित मतदार संघ असून या मतदार संघात केळी उत्पादक शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. मागच्या गेल्या ३० वर्षांपासून शेती रस्त्यांवर शासनाकडून कुठल्याही स्वरूपात योजना किंवा निधी (फंड) न उपलब्ध झाल्यामुळे या भागातील शेती रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झालेली आहे. त्यातच या भागातून मोठ्या प्रमाणावर मोठ्या प्रमाणावर बाहेरील देशात व इतर राज्यात खूप मोठ्या प्रमाणावर केळी निर्यात केली जाते. यामुळे शेतकरी वर्गाला येथे मोठी कसरत करावी लागते .रस्ते खराब असल्यामुळे शेती माल वाहतुक तसेच शेती साहित्य वाहतुकीसाठी प्रचंड अडचणींचा सामना करावा लागतो.
दरम्यान, मागील काळात पालकमंत्री शेत पाणंद योजनेतून १ लाख रू. निधी उपलब्ध व्हायचा यात तात्पुरती रस्त्यांची डागडुजी होऊन मुरमिकरण व्हायचे परंतु नुकतेच मागील काळात मातोश्री पाणंद योजना आणून शासनाने शेती रस्त्यांची दशा पालटवण्याठी प्रयत्न केले. यातून बरेचशे शेती रस्ते मंजूर आहेत. परंतु ही कामे अद्यापही सुरू न झाल्याने ही योजना थंड बस्त्यात आहे. त्यामुळे सद्या स्थितीत शेती रस्ते हा प्रचंड जिव्हाळ्याचा आणि कळीचा मुद्दा झालेला असून शेतकऱ्यांना सोयीचे व्हावे यासाठी शासनाच्या कुठल्यातरी विभागातून स्वतंत्र योजना किंवा हेड यातून शेती रस्त्यांसाठी तातडीने निधी उपलब्ध करून दिल्यास यातून शेती रस्ते मोठ्या प्रमाणावर होतील व शेतकऱ्यांना शेत माल वाहतुकीस फायदा होऊन खूप मोठा दिलासा मिळेल.अशी मागणी करतांना त्यांनी पुढे शेतकरी वर्गाला दिलासा देण्यासाठी शेत शिवारातील रोहित्र तसेच विजेच्या कामांसाठी जिल्हा नियोजन मध्ये निधी वाढवून मिळावा आणि सोबतच आदिशक्ती मुक्ताई हे तिर्थक्षेत्र श्रद्धेचा विषय असल्याने तिर्थक्षेत्र संत मुक्ताई समाधी स्थळ (कोथळी) मुक्ताईनगर येथे रखडलेल्या कामासाठी वाढीव निधी उपलब्ध करून देणे मुक्ताईनगर तालुका हा वारकरी व भाविकांच्या दृष्टीने श्रद्धेचे महत्वपूर्ण तिर्थ स्थळ आहे. त्यामुळे मुक्ताईनगर शहरात सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक त्या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे बसवून या प्रणालीची देखभाल दुरुस्तीसाठी तात्काळ निधी उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी आमदार चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.
मागण्यांना उपमुख्य मंत्री फडणवीस यांनी दाखविली सकारात्मकता
सर्व मागण्यांच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारत्मकता दाखविली असून यावर प्रशासन स्तरावर चर्चा करून निर्णय घेण्यात येईल असे आश्वासित केले आहे. काही मुद्द्यांवर जिल्हाधिकारी मित्तल यांना सूचित केले.