Dhanbad Apartment Fire: झारखंड येथील धनबादमध्ये (Dhanbad) एक धक्कादायक घटना घडली आहे. धनबादमधील बँक मोड पोलीस स्टेशन हद्दीतील जोडा फाटक रोडवर असलेल्या आशीर्वाद अपार्टमेंटमध्ये भीषण आग लागली. अपार्टमेंटच्या तिसऱ्या मजल्यावर लागलेली ही आग (Dhanbad Apartment Fire) इतकी भिषण होती की, यात 14 जणांचा मृत्यू झाला असून त्यात दहा महिला आणि तीन लहान मुलांचा समावेश आहे. यासह 17 जण गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान, अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्यासाठी युद्धपातळावर प्रयत्न करत आहे. दरम्यान, आद्याप आगीचे कारण समजू शकलेले नाही.
17 जखमींना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या आगीतून आतापर्यंत ५० हून अधिक अडकलेल्या लोकांना रेस्क्यू करण्यात आले आहे. बचावकार्य अजूनही सुरू आहे.
मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी व्याक्त केला शोक
धनबाद के आशीर्वाद टावर अपार्टमेंट में आग लगने से लोगों की मृत्यु अत्यंत मर्माहत करने वाली है। जिला प्रशासन द्वारा युद्ध स्तर पर कार्य किया जा रहा है तथा हादसे में घायल लोगों को उपचार उपलब्ध कराया जा रहा है। मैं खुद पूरे मामले को देख रहा हूँ।
— Hemant Soren (@HemantSorenJMM) January 31, 2023
दरम्यान, या घटनेबाबत राज्याचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी शोक व्यक्त केला आहे. मृतांच्या नातेवाईकांना शोकसंवेदना दिल्या आहेत. याबाबत ट्विट करत मुख्यमंत्री म्हणाले, “धनबादच्या आशीर्वाद टॉवर अपार्टमेंटला लागलेल्या आगीमुळे झालेल्या लोकांचा मृत्यू अत्यंत हृदयद्रावक आहे. जिल्हा प्रशासन युद्धपातळीवर काम करत असून अपघातात जखमी झालेल्यांवर उपचार केले जात आहेत. “मी स्वतः मी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत आहे. देव मृतांच्या आत्म्याला शांती देवो आणि शोकाकुल कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो. जखमींना लवकरात लवकर वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले जात आहेत.”
एक दिवापुर्वी लागली होती कुमारधुबी मार्केटमध्ये भीषण आग
दरम्यान, आशीर्वाद अपार्टमेंटमध्ये भीषण आगेच्या एक दिवस आधी म्हणजेच 30 जानेवारीला धनबादच्या कुमारधुबी मार्केटमध्ये भीषण आग लागली होती, या आगीत 19 दुकाने जळून खाक झाली होती. या आगीत दुकानदारांचेही मोठे नुकसान झाले आहे.