DeputyCMDevendraFadanavis VC : संत मुक्ताई मंदिराच्या रखडलेल्या कामासाठी शासनाच्या नवीन (DSR) दरपत्रकानुसार निधी मिळावा : आ. चंद्रकांत पाटील
जळगाव : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन तसेच गृहमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडियो कॉन्फरन्स (V.C)द्वारे जळगाव जिल्हा प्रशासन आणि लोक प्रतिनिधी यांचेकडून जळगाव जिल्ह्यातील भुसावळ व सावदा परिसरात बसलेल्या सौम्य भूकंपाच्या धक्के याबाबत सविस्तर माहिती घेतली.तसेच जिल्ह्यातील इतर विकास कामे व प्रशासनिक कामाचा आढावा घेतला या बैठकीत मुक्ताईनगर चे आमदार चंद्रकांत पाटील यांनी व्हि.सी द्वारे चर्चेत सहभाग नोंदवून मतदार संघातील शेती रस्ते यावर निधी ची तरतूद तसेच शेतकरी वर्गाला दिलासा देण्यासाठी शेत शिवारातील रोहित्र तसेच विजेच्या कामांसाठी जिल्हा नियोजन मध्ये निधी वाढवून मिळावा आणि सोबतच आदिशक्ती मुक्ताई हे तिर्थक्षेत्र श्रद्धेचा विषय असल्याने तिर्थक्षेत्र संत मुक्ताई समाधी स्थळ (कोथळी) मुक्ताईनगर येथे रखडलेल्या कामासाठी वाढीव निधी उपलब्ध करून देणे व मुक्ताईनगर शहरात सी सी टी व्ही कॅमेरे बसवून यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून निधी उपलब्ध करणे व इतर असंख्य विषयांवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेशी चर्चा केली. यावेळी बैठकीत जळगाव जिल्हा पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील, आमदार तथा जिल्हा दूध संघ चेअरमन मंगेश चव्हाण तसेच जिल्हाधिकारी अमन मित्तल, जिल्हा नियोजन अधिकारी प्रताप पाटील तसेच इतर सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

आदिशक्ती संत मुक्ताई समाधी स्थळ (कोथळी), मुक्ताईनगर हे देवस्थान संत ज्ञानेश्वरादी चौघे भावंडा मधील तसेच महाराष्ट्रातील संत परंपरा आणि वारकरी संप्रदायातील चार प्रमुख तिर्थक्षेत्रांपैकी एक महत्त्वाचे तिर्थक्षेत्र असून सन २०१६ -१७ मध्ये माजी मंत्री तत्कालीन विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्या प्रयत्नातून येथील मंदिराचा जिर्णोद्धार तसेच सदरील मंदिर हेमाडपंथी मंदिराचे लूक स्वरूपातील विकास काम मंजूर झालेले होते. परंतु तत्कालीन वेळेस शासनाचे DSR रेट खूप कमी होते, त्यामुळे त्या काळातील सिमेंट, आसारी व बांधकाम साहित्याचे दरही आवाक्यात होते. परंतु सदरील बांधकाम अतिशय संत गतीने होत असल्याने तसेच मधल्या काळात कामावर निधी उपलब्ध न होणे, भरिसर भर कोरोना विश्व महामारी आदी कारणांनी काम प्रचंड रेंगाळले तसेच सद्य स्थितीत बांधकाम साहित्याचे दर गगनाला भिडलेले असून शासनाचे दरपत्रक (DSR रेट) यातही खूप मोठा फरक पडलेला असून सदरील तिर्थक्षेत्राच्या रखडलेल्या बांधकामाला गती देणे गरजेचे आहे. त्यामूळे येथील विकास कामासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात येवून तातडीने निधी उपलब्ध करण्यात यावा अशी मागणी आमदार चंद्रकांत पाटील यांनी उप मुख्यमंत्री तथा वित्त मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे केली आहे. उपमुख्य मंत्री फडणवीस यांनी देखील यासंदर्भात सकारत्मकता दाखविलेली आहे.
Like this:
Like Loading...