छत्रपती संभाजीनगर, 24 मार्च (हिं.स.)।
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य रा. रं. बोराडे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली.
प्राचार्य बोराडे यांच्या निधनानंतर सहवेदना व्यक्त करण्यासाठी पवार आज छत्रपती संभाजीनगर येथे आले होते. प्राचार्य बोराडे यांच्या विद्यानिकेतन कॉलनी येथील ‘शिवार’ या निवासस्थानी त्यांनी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली व विचारपूस केली.
प्राचार्य बोराडे यांच्या पत्नी सुलभा बोराडे, कन्या प्रेरणा दळवी, तृप्ती इंगळे, हर्षवर्धन दळवी, पृथ्वी इंगळे, आदित्य जगताप, पुतणे संजय बोराडे, अनिरुद्ध पाटील हे बोराडे यांचे कुटुंबीय तसेच आ. सतीश चव्हाण, आ. विक्रम काळे यावेळी उपस्थित होते.