अमरावती, 3 मार्च (हिं.स.)
प्रशांत कोरटकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविरुद्ध केलेल्या बेताल वक्तव्याच्या विरोधात आज, ३ मार्च रोजी, अमरावतीत शिवप्रेमी व सर्वपक्षीय शिवसन्मान मोर्चाचे आयोजन करण्यात आले. हा मोर्चाला पंचवटी चौक येथून सुरुवात होऊन इर्विन चौक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण केल्यानंतर गर्ल्स हायस्कूल चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकला. मोर्चाच्या माध्यमातून कोरटकर यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
या महामोर्चामध्ये काँग्रेसचे खासदार बळवंत वानखडे, शिवसेना (उबाठा) आमदार गजानन लवटे, माजी आमदार यशोमती ठाकूर, माजी आमदार सुनील देशमुख यांच्यासह सर्व पक्षीय नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यावेळी मोठ्या संख्येने शिवप्रेमींनी “छत्रपती शिवाजी महाराज की जय” अशा घोषणा देत आक्रोश व्यक्त केला. या आंदोलनाद्वारे सरकारकडे कोरटकर यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली असून, भविष्यात अशा प्रकारच्या घटनांना सहन केले जाणार नाही, असा इशारा आंदोलकांनी दिला.
यशोमती ठाकूर बळवंत वानखडे सुनील देशमुख विलास भाऊ इंगोले बबलू शेखावत मिलिंद चिमोटे किशोर बोरकर प्रदीप हीवसे, हरीश मोरे किशोर सांगोले अरविंद गावंडे प्रदेश उपाध्यक्ष मराठा सेवा संघ राजेंद्र ठाकरे जिल्हाध्यक्ष मराठा महासंघ अजय लेंडे शिव सन्मान महामोर्चा सन्म वयक प्रवीण मनोहर आदी उपस्थित होते.
सदर च्या मोर्चामध्ये अखिल भारतीय मराठा महासंघ,मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड,जिजाऊ ब्रिगेड
काँग्रेस ,राष्ट्रवादी काँग्रेस,शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ,प्रहार संघटना,शिवसेना शिंदे गट. व अन्य संघटना सामील सामील झाल्या होत्या.