पुणे, 20 मार्च (हिं.स.)।
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी बदनामीकारक वक्तव्य केल्याप्रकरणी लोकसभेचे विरोधी पक्षनेते व काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याविरोधात दाखल खटल्याची सुनावणी ‘समरी ट्रायल’ऐवजी ‘समन्स ट्रायल’ म्हणून चालविण्यात यासाठी दाखल अर्जावर विशेष न्यायालय सात एप्रिलला आदेश देणार आहे. राहुल यांचे वकील अॅड. मिलिंद पवार यांनी हा अर्ज केला असून या संदर्भात दावा दाखल करणारे सात्यकी सावरकर यांचे वकील अॅड. संग्राम कोल्हटकर यांनीही त्याला सहमती दर्शविली आहे.
याबाबत, विशेष न्यायाधीश अमोल शिंदे यांच्या न्यायालयात दोन्ही पक्षांचा युक्तिवाद पूर्ण झाला असून, न्यायालयाने हा खटला ‘समन्स ट्रायल’ स्वरुपात चालविण्यास परवानगी दिल्यास दोन्ही पक्षांना पुरावे सादर करून साक्ष व उलटतपासणी नोंदविता येणार आहेत.