नाशिक, 23 मार्च (हिं.स.)।
शहीद दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी शासकीय विश्रामगृह येथे शहीद भगतसिंग, शहीद राजगुरू आणि शहीद सुखदेव यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, जिल्हाधिकारी जलज शर्मा आदी उपस्थित होते.