मुंबई, 28 मार्च (हिं.स.)।मध्य रेल्वे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन खाली दिलेल्या तपशीलांनुसार विशेष गाड्यांच्या सेवा कालावधीत वाढ करणार आहे …
१. ट्रेन क्रमांक 01435 सोलापूर – लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक विशेष, जी दिनांक २५.०३.२०२५ पर्यंत चालविण्याची सूचना देण्यात आली होती, ती आता दिनांक २९.०४.२०२५ पर्यंत येणार आहे.
२. ट्रेन क्रमांक 01436 लोकमान्य टिळक टर्मिनस – सोलापूर साप्ताहिक विशेष, जी दिनांक २६.०३.२०२५ पर्यंत चालण्याची सूचना देण्यात आली होती, ती आता दिनांक ३०.०४.२०२५ पर्यंत चालवण्यात येणार आहे.
३. ट्रेन क्रमांक 01438 तिरुपती – सोलापूर साप्ताहिक विशेष, जी दिनांक २८.०३.२०२५ पर्यंत चालण्याची सूचना देण्यात आली होती, ती आता दिनांक २५.०४.२०२५ पर्यंत चालवण्यात येणार आहे.
४. ट्रेन क्रमांक 01437 सोलापूर – तिरुपती साप्ताहिक विशेष, जी दिनांक २७.०३.२०२५ पर्यंत चालण्याची सूचना देण्यात आली होती, ती आता दिनांक २४.०४.२०२५ पर्यत चालवण्यात येणार आहे.
५. ट्रेन क्रमांक 01091/01092 खंडवा – सनवाड – खंडवा अनारक्षित विशेष, जी दिनांक ३०.०३.२०२५ पर्यंत चालविण्याची सूचना देण्यात आली होती, ती आता दिनांक २९.०४.२०२५ पर्यंत चालवण्यात येणार आहे.
दिनांक ३१.०३.२०२५ पर्यंत धावण्यासाठी अधिसूचित केलेल्या खालील दैनिक गाड्यांच्या सेवा दिनांक ३०.०४.२०२५ पर्यंत वाढविण्यात आल्या आहेत.
ट्रेन क्रमांक 01461 सोलापूर – दौंड अनारक्षित दैनंदिन विशेष.
ट्रेन क्रमांक 01462 दौंड – सोलापूर अनारक्षित दैनिक विशेष.
ट्रेन क्रमांक 01463 सोलापूर – कलबुरगि अनारक्षित दैनंदिन विशेष.
ट्रेन क्रमांक 01464 कलबुरगि – सोलापूर अनारक्षित दैनंदिन विशेष.
ट्रेन क्रमांक 01212 नाशिक रोड – बडनेरा अनारक्षित दैनंदिन विशेष.
ट्रेन क्रमांक 01024 कोल्हापूर – पुणे दैनंदिन विशेष.
ट्रेन क्रमांक 01023 पुणे – कोल्हापूर दैनंदिन विशेष.
ट्रेन क्रमांक 01487 पुणे – हरंगुल दैनंदिन विशेष
ट्रेन क्रमांक 01488 हरंगुल – पुणे दैनंदिन विशेष.
वरील गाड्यांच्या वेळेत, संरचनेत आणि थांब्यात कोणताही बदल होणार नाही.
दिनांक ३१.०३.२०२५ पर्यंत चालवण्यासाठी अधिसूचित केलेली ट्रेन क्रमांक 01211 बडनेरा – नाशिक रोड अनारक्षित दैनंदिन विशेष आता दिनांक ३०.०४.२०२५ पर्यंत चालेल आणि दिनांक ०१.०४.२०२५ पासून सुधारित वेळेनुसार चालले, जसे की …
गाडी क्रमांक 01211 बडनेरा येथून सकाळी १०.०५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी सायंकाळी १९.०५ वाजता नाशिक रोड येथे पोहोचेल.
ट्रेन क्रमांक 01211 च्या संरचनेत आणि थांब्यात कोणताही बदल होणार नाही.
आरक्षण : विशेष गाडी क्रमांक 01435, 01436, 01437, 01024, 01023, 01487 आणि 01488 च्या विस्तारित फेऱ्यांसाठी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या वेबसाइटवर विशेष शुल्कासह बुकिंग सुरू आहे.या विशेष ट्रेनच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी, कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस ॲप डाउनलोड करा.