मुंबई, 15 मार्च (हिं.स.)।
मध्य रेल्वे, मुंबई विभाग दिनांक १६.०३.२०२५ (रविवार) रोजी उपनगरीय विभागांवर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मेगा ब्लॉक परिचालीत करणार आहे.
तपशील खालीलप्रमाणे आहे …
ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान सकाळी १०.४० ते दुपारी ३.४० वाजेपर्यंत अप आणि डाऊन जलद मार्गावर लोकल सेवा सुरू राहील.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी ०९.३४ ते दुपारी ०३.०३ पर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद/सेमी-जलद लोकल ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळवल्या जातील, त्या त्यांच्या संबंधित थांब्यांव्यतिरिक्त कळवा, मुंब्रा आणि दिवा स्थानकांवर थांबतील. या गाड्या त्यांच्या नियोजित वेळेपेक्षा १० मिनिटे उशिरा त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचतील.
कल्याण येथून सकाळी १०.२८ ते दुपारी ३.४० वाजेपर्यंत सुटणाऱ्या अप जलद/सेमी-जलद सेवा कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर वळवल्या जातील. या गाड्या त्यांच्या संबंधित थांब्यांव्यतिरिक्त दिवा, मुंब्रा आणि कळवा स्थानकांवर थांबतील आणि पुढे मुलुंड स्थानकावर अप जलद मार्गावर वळवल्या जातील. या गाड्या त्यांच्या नियोजित वेळेपेक्षा १० मिनिटे उशिरा त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचतील.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/दादर येथून सुटणाऱ्या डाऊन मेल/एक्सप्रेस गाड्या ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान पाचव्या मार्गावरून वळवल्या जातील.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/दादर येथे येणाऱ्या अप मेल/एक्सप्रेस गाड्या कल्याण आणि ठाणे/विक्रोळी स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गावरून वळवल्या जातील.
पनवेल-वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ वाजेपर्यंत
(नेरुळ/बेलापूर-उरण बंदर मार्ग वगळता)
सकाळी १०.३३ ते दुपारी ३.४९ वाजेपर्यंत पनवेल येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि सकाळी ९.४५ ते दुपारी ३.१२ वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून पनवेल/बेलापूर येथे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.
पनवेल येथून ठाण्याकडे जाणाऱ्या अप ट्रान्स-हार्बर मार्गावरील सेवा सकाळी ११.०२ ते दुपारी ३.५३ पर्यंत आणि ठाणे येथून पनवेल येथे जाणाऱ्या डाउन ट्रान्स-हार्बर मार्गावरील सेवा सकाळी १०.०१ ते दुपारी ३.२० पर्यंत बंद राहतील.
ब्लॉक काळात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-वाशी विभागात विशेष लोकल गाड्या चालवल्या जातील.
ब्लॉक कालावधीत ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्स-हार्बर लाईन सेवा उपलब्ध असतील.
ब्लॉक कालावधीत बेलापूर/नेरुळ आणि उरण स्थानकांदरम्यान पोर्ट लाईन सेवा उपलब्ध असतील.
हे मेगा ब्लॉक्स पायाभूत सुविधांच्या देखभाल आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत. प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे अशी विनंती रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत आहे