मुंबई, 23 मार्च (हिं.स.)।
उन्हाळी सुट्ट्या सुरू होत आहेत आणि प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने मुंबई-नागपूर / करमळी / तिरुअनंतपुरम, पुणे-नागपूर आणि दौंड-कलबुरगि दरम्यान ३३२ उन्हाळी विशेष रेल्वे सेवा चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
तपशील खालीलप्रमाणे आहेत …
१. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -नागपूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस द्विसाप्ताहिक विशेष गाडी (५० सेवा)
ट्रेन क्रमांक 02139 द्विसाप्ताहिक विशेष गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ०६.०४.२०२५ ते २९.०६.२०२५ पर्यंत दर मंगळवार आणि रविवारी ००.२० वाजता सुटेल आणि नागपूर येथे त्याच दिवशी १५:३० वाजता पोहोचेल. (२५ सेवा)
ट्रेन क्रमांक 02140 द्विसाप्ताहिक विशेष गाडी ०६.०४.२०२५ ते २९.०६.२०२५ पर्यंत दर मंगळवार आणि रविवारी २०:०० वाजता नागपूर येथून सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी १३:३० वाजता पोहोचेल (२५ सेवा)
संरचना : एक द्वितीय वातानुकुलित, ५ तृतीय वातानुकूलित, १० शमनयान, ४ सामान्य द्वितीय श्रेणी आणि २ सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन.
थांबे : दादर (फक्त 02139 साठी), ठाणे, कल्याण, इगतपुरी (फक्त 02140 साठी), नाशिकरोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा.
२. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -करमळी-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस साप्ताहिक विशेष गाडी (१८ सेवा)
ट्रेन क्रमांक 01151 साप्ताहिक विशेष गाडी १०.०४.२०२५ ते ०५.०६.२०२५ पर्यंत दर गुरुवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ००.२० वाजता सुटेल आणि करमळी येथे त्याच दिवशी १३.३० वाजता करमाळी येथे पोहोचेल (९ सेवा).
ट्रेन क्रमांक 01152 साप्ताहिक विशेष गाडी १०.०४.२०२५ ते ०५.०६.२०२५ पर्यंत दर गुरुवारी करमळी येथून १४:१५ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी ०३.४५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचेल (९ सेवा).
संरचना : एक द्वितीय वातानुकुलित, ५ तृतीय वातानुकुलित, १० शमनयान, ४ सामान्य द्वितीय श्रेणी आणि २ सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन.
थांबे : दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिवि.
३. लोकमान्य टिळक टर्मिनस – करमळी-लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक विशेष (१८ सेवा)
ट्रेन क्रमांक 01129 साप्ताहिक विशेष १०.०४.२०२५ ते ०५.०६.२०२५ पर्यंत दर गुरुवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून २२.१५ वाजता सुटेल आणि करमळी येथे दुसऱ्या दिवशी १२.०० वाजता येथे पोहोचेल (९ सेवा).
ट्रेन क्रमांक 01130 साप्ताहिक विशेष ११.०४.२०२५ ते ०६.०६.२०२५ पर्यंत दर शुक्रवारी १४:३० वाजता करमळी येथून सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी ०४.०५ वाजता पोहोचेल (९ सेवा).
संरचना : एक प्रथम वातानुकुलित, दोन द्वितीय वातानुकुलित, सहा तृतीय वातानुकुलित, ८ शमनयान, २ जनरेटर कार आणि १ पॅन्ट्री कार (लॉक केलेल्या स्थितीत).
थांबे : ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिवि.
४. लोकमान्य टिळक टर्मिनस -तिरुवनंतपुरम उत्तर – लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक विशेष – (१८ सेवा)
ट्रेन क्रमांक 01063 साप्ताहिक विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ०३.०४.२०२५ ते २९.०५.२०२५ पर्यंत दर गुरुवारी १६:०० वाजता सुटेल आणि तिरुवनंतपुरम उत्तर येथे दुसऱ्या दिवशी २२.४५ वाजता येथे पोहोचेल. (९ सेवा)
ट्रेन क्रमांक 01064 साप्ताहिक विशेष ट्रेन ०५.०४.२०२५ ते ३१.०५.२०२५ पर्यंत दर शनिवारी १६:२० वाजता तिरुवनंतपुरम उत्तर येथून सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे तिसऱ्या दिवशी ००.४५ वाजता पोहोचेल. (९ सेवा)
संरचना : एक द्वितीय वातानुकुलित, सहा तृतीय वातानुकुलित, ९ शमनयान, ४ सामान्य श्रेणी, १ सामन्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर कार.
थांबे : ठाणे, पनवेल, पेण, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम, करमळी, मडगाव जंक्शन, कारवार, गोकर्ण रोड, कुमठा, मुर्डेश्वर, भटकळ, मुकांबिका रोड बैंदूर, कुंदापूर, ऊडिपी, सुरतकल, मंगळुरू जंक्शन, कासारगोड, कन्नूर, कालिकत, तिरूर, शोरानूर, त्रिशूर, एर्नाकुलम टाउन, कोट्टायम, चांगनासेरी, तिरुवल्ला, चेंगन्नूर, मावेलीकारा, कायनकुलम आणि कोल्लम.
५. पुणे – नागपूर- पुणे साप्ताहिक अति जलद वातानुकुलित विशेष (२४ सेवा )
ट्रेन क्रमांक 01469 साप्ताहिक अति जलद वातानुकुलित विशेष ०८.०४.२०२५ ते २४.०६.२०२५ पर्यंत पुणे येथून दर मंगळवारी १५.५० वाजता पुण्याहून सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ६.३० वाजता नागपूरला पोहोचेल (१२ सेवा).
ट्रेन क्रमांक 01470 साप्ताहिक अति जलद वातानुकुलित विशेष ०९.०४.२०२५ ते २५.०६.२०२५ नागपूर येथून दर बुधवारी ८.०० वाजता सुटेल आणि पुणे येथे त्याच दिवशी २३:३० वाजता पुण्याला पोहोचेल (१२ सेवा).
संरचना : तीन द्वितीय वातानुकुलित, १५ तृतीय वातानुकुलित, १ सामन्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर व्हॅन.
६. पुणे – नागपूर – पुणे साप्ताहिक अतिजलद विशेष (२४ सेवा)
ट्रेन क्रमांक 01467 साप्ताहिक अतिजलद विशेष ०९.०४.२०२५ ते २५.०६.२०२५ पर्यंत दर बुधवारी पुणे येथून १५.५० वाजता सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी ६.३० वाजता नागपूरला पोहोचेल (१२ सेवा).
ट्रेन क्रमांक 01468 साप्ताहिक अतिजलद विशेष १०.०४.२०२५ ते २६.०६.२०२५ पर्यंत दर गुरुवारी नागपूर येथून ८.०० वाजता सुटेल आणि पुणे येथे त्याच दिवशी रात्री २३:३० वाजता पोहोचेल (१२ सेवा).
संरचना : एक प्रथम वातानुकुलित, एक द्वितीय वातानुकुलित, दोन तृतीय वातानुकुलित, ५ शमनयान, ६ सामान्य द्वितीय श्रेणी आणि २ सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन.
01469/01470 आणि 01467/01468 साठी थांबे :- उरुळी, दौंड कॉर्ड लाईन, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा
७) दौंड-कलबुरगि अनारक्षित विशेष – आठवड्यातून ५ दिवस (१२८ सेवा)
ट्रेन क्रमांक 01421 अनारक्षित विशेष ०५.०४.२०२५ ते ०२.०७.२०२५ पर्यंत दौंड येथून आठवड्यातून ५ दिवस (गुरुवार आणि रविवार वगळता) ०५.०० वाजता सुटेल आणि कलबुरगि येथे त्याच दिवशी ११.२० वाजता पोहोचेल. (६४ सेवा)
ट्रेन क्रमांक 01422 अनारक्षित विशेष ०५.०४.२०२५ ते ०२.०७.२०२५ पर्यंत आठवड्यातून ५ दिवस (गुरुवार आणि रविवार वगळता) कलबुरगि येथून १६:१० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी २२.२० वाजता दौंड येथे पोहोचेल. (६४ सेवा)
८) दौंड- कलबुरगि अनारक्षित विशेष – द्विसाप्ताहिक (५२ सेवा)
ट्रेन क्रमांक 01425 अनारक्षित विशेष ०३.०४.२०२५ ते २९.०६.२०२५ पर्यंत दर गुरुवार आणि रविवारी दौंड येथून ५.०० वाजता सुटेल आणि कलबुरगि येथे त्याच दिवशी रात्री ११:२० वाजता पोहोचेल. (२६ सेवा)
ट्रेन क्रमांक 01426 अनारक्षित विशेष गाडी ०३.०४.२०२५ ते २९.०६.२०२५ पर्यंत दर गुरुवार आणि रविवारी कलबुरगि येथून २०:३० वाजता सुटेल आणि दौंड येथे दुसऱ्या दिवशी २:३० वाजता पोहोचेल. (२६ सेवा)
01421/01422 आणि 01425/01426 साठी संरचना :, १० सामान्य द्वितीय श्रेणी आणि २ सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन
01421/01422 आणि 01425/01426 साठी थांबे : भिगवण, पारेवाडी, जेऊर, केम, कुर्डुवाडी, माढा, मोहोळ, सोलापूर, टिकेकरवाडी, होटगी, अक्कलकोट रोड, बोरोटी, दुधनी आणि गाणागापूर.
आरक्षण : विशेष ट्रेन क्रमांक 02139, 02140, 01151, 01152, 01129, 01130, 01063, 01469, 01470, 01467 आणि 01468 चे बुकिंग २४.०३.२०२५ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या वेबसाइटवर सुरु होईल.
अतिजलद मेल / एक्सप्रेस ट्रेनसाठी लागू असलेल्या अनारक्षितसाठी सामान्य शुल्कासह अनारक्षित कोचसाठी तिकिटे यूटीएस द्वारे बुक करता येतील.
तपशीलवार वेळापत्रक आणि थांब्यांसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES अॅप डाउनलोड करा.