मुंबई, 23 मार्च (हिं.स.) : सीएट या भारतातील आघाडीच्या टायर उत्पादक कंपनीने आज आपल्या स्पोर्टड्राइव्ह श्रेणीत तीन अत्याधुनिक टायर सादर केले. यामुळे अल्ट्रा-हाय-परफॉर्मन्स आणि लक्झरी चारचाकी वाहन क्षेत्रात कंपनीचे अस्तित्व अधिक ठळक झाले आहे. या नव्या सादरीकरणामुळे सीएट ही रन-फ्लॅट टायर्स आणि २१-इंच झेडआर-रेटेड टायर्स तयार करणारी पहिली भारतीय टायर उत्पादक कंपनी बनली आहे. हे टायर ताशी ३०० किलोमीटरपेक्षा जास्त वेग सहन करू शकतात. ‘काम’ तंत्रज्ञानामुळे हे टायर भारताच्या ऑटोमोटिव्ह उत्पादन क्षेत्रासाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार आहेत.
‘सीएट’चे हे नवीन टायर्स जर्मनीतील आघाडीच्या आंतरराष्ट्रीय ऑटोमोटिव्ह चाचणी केंद्रांमध्ये कठोर चाचण्यांमधून सिद्ध झाले असून, उच्च दर्जाची कामगिरी आणि सुरक्षा यांचे निकष त्यांनी पूर्ण केले आहेत.
‘सीएट’चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अर्णब बॅनर्जी म्हणाले, “स्पोर्टड्राइव्ह टायर्सच्या नवीन श्रेणीत ‘झेडआर-रेटेड’ टायर्स, ‘काम’ तंत्रज्ञान आणि ‘रन-फ्लॅट’ टायर्स यांचा समावेश करून ‘सीएट’ने प्रीमियम आणि तंत्रज्ञान-आधारित ब्रँड म्हणून आपली स्थिती अधिक बळकट केली आहे. लक्झरी आणि उच्च-कामगिरीच्या वाहनांमध्ये सुरक्षितता, आराम आणि उत्कृष्टता वाढवण्याच्या बांधिलकीला आम्ही पुढे नेत आहोत. ‘रन-फ्लॅट टायर्स’ सादर करणारी पहिली भारतीय कंपनी, अशी बिरुदावली बाळगण्याचा आम्हाला मोठा अभिमान आहे. यामुळेच चारचाकी टायर क्षेत्रातील आमचे नेतृत्व अधोरेखित झाले आहे.”
‘सीएट’चे मुख्य विपणन अधिकारी लक्ष्मी नारायणन बी. यांनी सांगितले, “सीएटची ही नवीन उत्पादने टायर अभियांत्रिकीतील आमच्या उत्कृष्टतेच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे प्रतिक आहेत. ‘रन-फ्लॅट’ टायर्स आणि ‘काम’ तंत्रज्ञान असलेले ‘झेडआर-रेटेड’ टायर्स यांच्या कठोर चाचण्या आम्ही जर्मनीतील आमच्या अत्याधुनिक संशोधन केंद्रांमध्ये घेतल्या असून त्यांतून हे टायर तावून-सुलाखून बाहेर पडले आहेत. आमचा इटालियन वारसा आणि जर्मन अभियांत्रिकी यांचा हा संयोग म्हणायला हवा. लक्झरी वाहनधारकांसाठी उच्चतम दर्जाची उत्पादने उपलब्ध करून देण्याचे आमचे ध्येय आहे.”
‘सीएट’ची ही प्रीमियम टायर श्रेणी प्रमुख बाजारपेठांमध्ये एप्रिलपासून उपलब्ध होणार आहे. दिल्ली एनसीआर, मुंबई, कोलकाता, पुणे, चंदीगड, उत्तर प्रदेश, बेंगळुरू, तामिळनाडू, कोइमतूर, मदुराई, केरळ, हैदराबाद, गुवाहाटी आणि अहमदाबाद येथे हे टायर मिळतील. ‘रन-फ्लॅट’ टायर्सची (आरएफटी) किंमत: १५,००० ते २०,००० रुपये अशी असून, २१ इंची ‘झेडआर-रेटेड अल्ट्रा-हाय-परफॉर्मन्स’ (यूएचपी) काम तंत्रज्ञानयुक्त टायरची किंमत: २५,००० ते ३०,००० रुपये इतकी आहे.
क्रांतिकारी टायर तंत्रज्ञानाची वैशिष्ट्ये :
• ‘सीएट’चे झेडआर-रेटेड २१-इंची टायर्स हे या ब्रॅंडची उच्च कामगिरी अधोरेखित करतात. ३०० किलोमीटर प्रतितासाहून अधिक वेग सहन करण्यासाठी विकसित केलेले हे अल्ट्रा-हाय-परफॉर्मन्स (यूएचपी) टायर्स लक्झरी वाहनांसाठी योग्य असून, तीव्र वेगातही उत्कृष्ट पकड, नियंत्रण आणि स्थिरता प्रदान करतात.
• ‘काम’ तंत्रज्ञान केबिनमधील आवाज लक्षणीय प्रमाणात कमी करते. त्यामुळे प्रवाशांना अधिक आराम लाभतो आणि प्रवास अधिक शांत व आनंददायी होतो.
• ‘सीएट’चे ‘रन-फ्लॅट’ टायर्स (आरएफटी) हे सुरक्षिततेतील महत्त्वपूर्ण प्रगती दर्शवतात. हे टायर्स पंक्चर झाल्यानंतरही वाहनाला निश्चित वेगाने चालू ठेवण्यास सक्षम करतात. त्यामुळे उच्च दर्जाच्या सेडान आणि एसयूव्ही गाड्यांसाठी अधिक सुरक्षितता आणि विश्वासार्हता निर्माण होते.
‘सीएट’ने टायर अभियांत्रिकीतील आपल्या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून आणि ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन या उद्योगातील प्रथमच अशी ही नवीन उत्पादने विकसित केली आहेत. लक्झरी आणि हाय-परफॉर्मन्स सेगमेंटमध्ये भारतात आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये कंपनीची उपस्थिती अधिक होण्याच्या करण्याच्या दृष्टीने हे तंत्रज्ञान महत्त्वपूर्ण ठरणार आहे.