शासकीय युरिया खाजगी कंपनीत नेल्याचे प्रकरण
नाशिक, 27 मार्च (हिं.स.) : नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पुरविण्यात येणाऱ्या युरिया खतामध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला असून या प्रकरणी दिंडोरी पोलीस ठाण्यामध्ये कृषी विभागाच्या वतीने गुन्हा दाखल करण्यात आला आहे हा घोटाळा करोडो रुपयाचा असल्याचे देखील सांगण्यात आले आहे.
याबाबत दिंडोरी पोलीस ठाण्याकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार, नाशिक जिल्ह्यामध्ये 5 मार्च रोजी मिळालेल्या माहितीनुसार दिंडोरी तालुक्यातील रामशेज किल्ला जवळ असलेल्या आशेवाडी येथील गोदरेज ॲग्रोटेक लिमिटेड या कंपनीच्या तपासणी मध्ये युरियाच्या मोठा साठा आढळून आला त्या युरियाच्या जागेवरती टेक्निकल ग्रेड युरिया अशा स्वरूपाचे सक्त सूचना लिहिलेले असताना देखील हा युरिया हा या कंपनीमध्ये आल्याचे जिल्हा परिषदेचे मोहीम अधिकारी दीपक नानासाहेब सोमवंशी यांना तपासणीमध्ये आढळून आले. त्यांनी याबाबतची माहिती घेत असताना
प्रोडक्शन मॅनेजर विष्णू समाधान बर गट व पवन फाळके यांच्या उपस्थितीमध्ये पूर्ण गोदामाची तपासणी केली असता 90 मॅट्रिक टन पेक्षाही अधिकचा युरिया खतांचा साठा हा या ठिकाणी मिळाला याबाबतचे बिल व अधिक माहिती सादर करण्यासाठी गोदरेज कंपनीला सादर करण्याचे सांगितले होते. पण ही माहिती सादर केली नाही दरम्यान मोहीम अधिकारी सोमवंशी यांनी याबाबतची माहिती जिल्ह्याचे कृषी अधिकारी शिवाजी आमले यांना दिली त्याबाबतची माहिती जिल्हा परिषदेला दिली त्यानंतर जिल्हा कृषी अधिकारी शिवाजी आमले यांनी दिलेल्या आदेशानुसार याबाबतचा गुन्हा हा दिंडोरी पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आला
असून मोहीम अधिकारी सोमवंशी यांनी या प्रकरणात गोदरेज कंपनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून हा साठा कंपनीसाठी नसतानाही त्याचा वापर करण्यात आला हे समोर आल्यामुळे युरिया खताचा काळाबाजार करणे व इतर कलमानुसार हा एकूण 9 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये कंपनीचे मालक कंपनी व्यवस्थापन वाहतूक करणारे वाहतूकदार त्याचबरोबर ज्या ठेकेदाराला हा ठेका देण्यात आला होता तो ठेकेदार यांचाही यामध्ये समावेश असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.