अमरावती, 30 एप्रिल (हिं.स.)
भारताचे नंदन वंदन कश्मीर येथील पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दहशतवाद्याकडून पर्यटकावर प्राण घातक भ्याड हल्ला करण्यात आला ज्यामध्ये निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला या भ्याड हल्ल्यामध्ये नेव्ही अधिकारी प्रशासनिक अधिकारी.व पर्यटक यांना आपला जीव गमावा लागला या भ्याड हल्ल्याचा निषेध व मृत्युमुखी पडलेल्या शहिदांना श्रद्धांजली म्हणून दर्यापूर बनोसा बाभळी येथील सुजाण नागरिकातर्फे कॅडल मार्च चे आयोजन करण्यात आले
गौरक्षण चौक ते डॉ बाबासाहेब आंबेडकर पार्क पर्यंत कॅन्डल मार्च मुख्य रस्त्यावरून शांततेत काढण्यात आला ज्यामध्ये सहभागी महिला पुरुषानी हातात मेणबत्त त्या.घेऊन निषेध दर्शविला डॉ बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे सर्वांनी मेणबत्त्या एकत्रित करून शहिदांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण केली असेच ज्या कुटुंबावर आघात घडला त्यांना सावरण्याची शक्ती प्रधान करण्याची प्रार्थना करण्यात आली कॅडल मार्चमध्ये बहुसंख्येने नागरिक व पत्रकार सहभागी झाले मार्च करिता दर्यापूर पोलीस प्रशासनाकडून चोख व्यवस्था ठेवण्यात आली भारत माता की जय भारत माता की जय या घोषणांनी समारोप करण्यात आला.