BSF Recruitment 2023: नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. बॉर्डर सिक्युरिटी फोर्स (BSF) कॉन्स्टेबल (ट्रेड्समन) पदांसाठी भरती प्रक्रीया राबवत आहे. यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही देखील या पदासाठी इच्छूक असाल तर अर्ज करण्यासाठी इच्छूक उमेदवारांनी BSF च्या rectt.bsf.gov.in या अधिकृत संकातस्थळाला भेट देत ऑनलाइन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख BSF वेबसाइटवर जाहिरात प्रकाशित झाल्यापासून ३० दिवसांच्या आत आहे. एकूण 1410 पदांसाठी ही भरली प्रक्रीया राबवली जाणार आहेत. जाणून घेऊया या
भरतीशी संबंधी अधिक माहीती.
एकूण 1410 पदांसाठी भरती
या भरती प्रक्रीयेदरम्यान एकूण 1410 पदांची भरती होणार आहे. यामध्ये पुरुष उमेदवारांसाठी 1343 तर महिला उमेदवारांसाठी 67 पदे आहेत.
शैक्षणिक पात्रता
या भरती प्रक्रीयेंतर्गत ज्या उमेदवारांना कॉन्स्टेबल (ट्रेडसमन) पदांसाठी अर्ज करायचा आहे त्यांनी कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून दहावी उत्तीर्ण केलेली असावी. यासोबतच ऑनलाइन अर्जाच्या शेवटच्या तारखेनुसार उमेदवाराची वयोमर्यादा १८ ते २५ वर्षांच्या दरम्यान असावी.
अर्ज करण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स
- स्टेप 1- कॉन्स्टेबल (ट्रेडसमन) पदांसाठी अर्ज करण्यासाठी सर्वात आधी अधिकृत संकेतस्थळ rectt.bsf.gov.in. वर जावे.
- स्टेप 2- अधिकृत संकातस्थळाच्या होम पेज पर जात “Constable Tradesman post” या लिंकवर क्लिक करा.
- स्टेप 3- “Constable Tradesman post” या लिंकवर क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल. या ठीकाणी उमेदवारांनी आपली नोंदणा करायची आहे.
- स्टेप 4- नोंदणी केल्यानंतर अर्ज भरल्यानंतर अर्जाची फी भरा.
- स्टेप 5- अर्जात भरलेली माहीती पुर्णपणे तपासल्यानंतर अर्ज सबमिट करा.
- स्टेप 6- त्यानंतर कन्फर्मेशन पेज डाउनलोड करत त्याची प्रू आपल्याजवळ ठेवा.