📰 ब्रेकिंग न्यूज! राष्ट्रवादीला मोठा झटका — संगीताताई भामरेंसह शेकडो पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जंगी प्रवेश!
🔸 राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) च्या जळगाव जिल्हा सामाजिक न्याय विभागाच्या महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्षा संगीताताई भामरे यांनी एक मोठा राजकीय निर्णय घेत, आपल्या असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.
🔸 त्यांनी मा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, युवानेते खा. डॉ. श्रीकांत शिंदे, पालकमंत्री गुलाबराव पाटील, शिवसेना संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी आणि आ. चंद्रकांतभाऊ पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून थेट शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.
📍 प्रवेश सोहळा अत्यंत जल्लोषात पार पडला, यावेळी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री मा. गुलाबराव पाटील, आमदार चंद्रकांतभाऊ पाटील, जिल्हाप्रमुख समाधान महाजन, तसेच मोठ्या संख्येने शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक बांधव उपस्थित होते.
✅ हा प्रवेश फक्त बदल नव्हे, तर जनतेच्या मनात विश्वासार्ह नेतृत्वाची निवड आहे!
✅ शिवसेना पक्षाचा विस्तार आणि ताकद जळगाव जिल्ह्यात अधिक बळकट होत आहे.