Blood Sugar Diet: सध्या अनेक जण मधुमेहाच्या (Diabetes) समस्येने ग्रस्त आहे. मधूमेहाच्या समस्येत रक्तातील साखर नियंत्रणात (Blood Sugar Control Tips) ठेवणे खूप गरजेचे असते. मात्र, अनेकजण या बाबींकडे दुर्लक्ष करताना दिसतात. मधुमेहाच्या रुग्णांना भूक जास्त प्रमाणात लागते. खाल्ल्यानंतर रक्तातील साखर वाढते. तुम्हाला ही समस्या जाणवत असेल तर ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. या लेखात आम्ही तुम्हाला रक्तातील साखरेची पातळी (Blood Sugar Control Food) कमी करण्यासाठी काय करावे, या विषयी सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया अधिक माहिती.
रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारावर लक्ष ठेवले पाहीजे. त्यानुसार, सकाळी उठल्यानंतर ते नाश्त्यापर्यंत तुम्ही कोणत्या गोष्टी खाव्यात हे तुम्हाला माहीत असलं पाहीजे. जेणे करून तुमच्या रक्तातील साखर नैसर्गिक पद्धतीने नियंत्रित राहू शकेल.
या पदार्थांचे करा सेवन
मोड आलेली मेथी
मेथी हे अनेक औषधी गुणधर्माने संपन्न आहे. मधुमेहाच्या समस्येत मोड आलेली मेथी प्रभावी ठरते. तुम्ही सकाळी एक वाटी मोड आलेली मेथी कांदा, आले, हिरवी मिरची आणि लिंबू सोबत खाल्ल्यास तुमच्या तोंडाची चवही टिकून राहत पोटही बराच काळ भरलेले राहते. हा आहार रक्तातील साखर नियंत्रण ठेवण्यासाठी उत्तम आहे. मेथीताल अँटीऑक्सिडंट इंसुलिनचे उत्पादन वाढवत साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात. हा नाश्ता सकाळी रिकाम्या पोटी खाण्याची सवय लावा.
कच्चे पनीर
प्रथिनेयुक्त आहार मधुमेहाच्या समस्येत फायदेशीर ठरतो. सामान्य: सकाळच्या वेळेत शुगर लेव्हल जास्त असते, अशात तुम्ही सकाळी 100 ग्रॅम कच्चे पनीर खाल्ले तर तुमची शुगर लेव्हल नियंत्रणात येते. कारण कच्च्या पनीरमध्ये कर्बोदकांचे प्रमाण नसते आणि कोणत्याही कोशिंबीर किंवा स्प्राउट्स सोबत खाल्ल्यास बराचवेळ भूक देखील लागत नाही. यामुळे रक्तात साखरेचे प्रमाणही नियंत्रात राहते.
मोरिंगा सूप
वजन कमी करण्यापासून ते मधुमेह आणि उच्च कोलेस्ट्रॉलपर्यंत सर्व समस्येवर मोरिंगा सूप प्रभावी ठरते. हे सूप सकाळी प्यायल्याने साखर नियंत्रित राहण्यास मदत होते. तसेच यामुळे शरीर आणि रक्तातील चरबी वितळते.
ओट्स
ओट्स तुमची साखर आणि रक्तातील चरबी कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते. ओट्स तुम्ही कोणत्याही स्वरूपात खाऊ शकतात. ओट्सचे सेवनाने रक्तातील इन्सुलिनची पातळी राखली जाते. ओट्स हे विद्राव्य फायबरपासून बनलेले असल्याने ते रक्तातील साखर नियंत्रित करते. कमी ग्लायसेमिक इंडेक्समुळे ओट्स सकाळी खाणे फायदेशीर आहे.
चिया सीड्स
चिया सीड्समध्ये फायबरचे प्रमाण जास्त असून ते रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास फायदेशीर ठरतं. मधुमेहाच्या रुग्णांसाठी चिया सीड्स एखाद्या संजीवनी प्रमाणे आहे. चिया सीड्स भिजवून सकाळी स्मूदी किंवा खिचडीच्या स्वरूपात खोवे.
(टीप : हा लेख सामान्य माहितीवर आधारीत आहे. कोणताही उपाय करून पाहण्याआधी वैद्यकीय सल्ला नक्की घ्यावा)