Bhusawal News :शहरातील वांजोळा रोडवरील बालाजी लॉन येथील लग्न समारंभातून २ लाख ९ हजाराच्या दागिण्यांसह पर्स लांबवल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी २ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहीती दि ८ रोजी बाजारपेठ पोलिसांतर्फे देण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहीती अशी की, शहरातील सुरभी नगर भागातील रहीवासी तथा कर सल्लागार सतिष शर्मा यांच्या मुलगी रश्मी हीचे शहरातील वांजोळा रोडवरील बालाजी लॉन येथे लग्न होते. लग्न समारंभात कार्यक्रम सुरु असताना सतिष शर्मा आणि त्यांची पत्नी स्टेजवर होते. दरम्यान त्यांच्या पत्नाने स्टेजवरील सोफ्यावर पर्स ठेवली होती. चोरट्यानी ही बाब लक्षात घेत कोणाचे लक्ष नसल्याची संधी साधत ती पर्स लांबवली.
या पर्समध्ये सोन्याच्या ३ अंगठ्या, कानातले ५ जोड टापसे, २ चैन, २ बांगड्या, नाकातील नथ, पॅडल असा सर्व सोन्याचा ऐवज, रोख १० हजार व मोबाईल असा एकूण २ लाख ९ हजाराचा ऐवज होता. हा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून यातील एका चोरट्याची ओळख पटली आहे. या प्रकरणी सतिष शर्मा यांनी फिर्याद दिल्याने कुणालकुमार जितेंद्रकुमार (रा. मध्यप्रदेश) व एका अनोळखी विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.