भंडारा, 22 मार्च (हिं.स.)।
भंडारा जिल्ह्यातील लाखनी शहरात विस्मृतीत गेलेल्या एका ब्रिटिश महिलेच्या 204 वर्षे जुन्या समाधीवर ग्रीनफ्रेंड् नेचर क्लबच्या वतीने पुष्प अर्पण करून आदरांजली देण्यात आली.दोन शतकांपूर्वीच्या या ऐतिहासिक घटनेला त्यांनी उजाळा दिला. सन 1821 मध्ये मेजर क्ले वॉटसन हे आपल्या पत्नी आणि सैन्य दलाच्या अधिकाऱ्यांसह रायपूरहून नागपूरला जात होते.
त्या काळात ब्रिटिश प्रशासन भारतात मोठ्या प्रमाणावर रस्ते आणि पूल बांधकाम सुरू होते. प्रवासादरम्यान, लाखनीयेथे पोहोचताच त्यांच्या पत्नी मिस. क्ले्ये वॉटसन यांची प्रकृती बिघडली होती.काही दिवस मुक्काम केल्यानंतरही प्रकृतीत सुधारणा न झाल्याने, अखेर 15 मार्च 1821 साली त्या महिलेचा मृत्यू झाला. त्यांच्या पार्थिवावर विधिपूर्वक अंत्यसंस्कार करून गावातील तलावाजवळ त्यांची समाधी बांधण्यात आली.
विस्मृतीत गेलेल्या या समाधीच्या शोधाला नवीन दिशा मिळाली पाच वर्षांपूर्वी, जेव्हा अभियंता स्व. चंद्रकांत भुते यांनी ‘डिस्कवरी ऑफ भंडारा’ या संशोधनाद्वारे. हा इतिहास उजेडात आणला.त्यामुळे मुरमाडी लाखनी येथील मिस क्ले्ये वॉटसन यांची समाधी पुरातत्व विभागाने या कडे लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.