Back Pain Remedy: सध्याच धावपळीच यूग त्यात चुकीची जीवनशैली यामुळे आरोग्याविषयी (Health Problem) अनेक समस्यानिर्माण होत आहे. यात हाडांच्या समस्येत मोठी वाढ झाली आहे. हाडांचे फ्रॅक्चर व इतर समस्यांबाबत प्रत्येकाला माहती असणे गरजेचे आहे. साधारणत: वाढत्या वयात हाडे कमकुवत होतात. मात्र, हल्ली चुकीच्या जीवनशैलीमुळे लहान वयातच हाडे कमकुवत होत आहे. यामुळे पाठ दुखीची समस्या (Back Pain) देखील निर्माण होते. या समस्येकडे दुर्लक्ष केल्यास पाठीच्या काण्यासंबंधित (Backbone Disease) गंभीर आजार उद्भवू शकतो. आजचा आमचा हा लेख याच विषयावर आहे. या लेखात आम्ही तुम्हाला कंबर दुखीची समस्या आणि उपाय याविषयी माहीती देणार आहोत. चला तर मग जाणून घेवूया आधिक माहीती.
प्रामुख्याने पौढांमध्ये कंबरदुखी, पाठीच्या कण्याची समस्या दिसून येते. मात्र, हल्ली वेगवेगळ्या वयोगटातील लोकांमध्ये ही समस्या दिसून येत आहे. विशेषत: तरुणांमध्येही ही समस्या दिसून येत आहे. मानवी शरीरात सर्वात नाजूक हाडांपैकी एक म्हणजे पाठीचा कणा. पाठीच्या काण्याची विशेष काळजी घेतली पाहिजे, नाहीतर गंभीर समस्या निर्माण होते. पाठीच्या काण्याची समस्या सुरु होण्याआधी शरीरात काही लक्षणे दिसतात. यात कंबर आणि पाठदुखी ही लक्षणे सर्वात महत्त्वाची आहे. ही लक्षणे दिसताच त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा.
अशी घ्या काळजी
- तुम्हाला आयुष्यात कधीही पाठीच्या निर्माण होवू नये, असे वाटत असल्यास तुम्ही दररोज किमान 15-20 मिनिटे व्यायाम केला पाहिजे.
- फील्ड जॉब करणाऱ्यांनी गाडी चालवताना जास्त वाकून बसू नये. तसेच बाईकचे हॅण्डल व्यवस्थित सेट करून घ्या. तसेच कंबरेचा व्यायाम करत संतुलित आहार घ्यावा.
- पाठदुखीची समस्या निर्माण होण्यास वाढते वजन देखील कारणीभूत ठरते. त्यामुळे तुमचं वजन नियंत्रणात राहील याची काळजी घ्या.
- आजकाल बैठे कामाची अनेकांना सवय लागली आहे. तुम्ही संगणकावर काम करत असाल तर काम करताना मान झुकवून बसू नये. संगणक डोळ्याच्या पातळीवर ठेवण्याचा प्रयत्न करा.
- हाडांच्या मजबूतीसाठी कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी महत्वाचे ठरतात. त्यामुळे आहारात कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी असलेले पदार्थ घ्या. तसेच नियमित व्यायाम करा.
- यासह तुमच्या शरीरातील कॅल्शियमची तपासणी करत अवश्यकतेनुसार वैद्यकीय सल्ला घ्या.
(टीप : हा लेख सामान्य माहितीवर आधारीत आहे. कोणताही उपाय करून पाहण्याआधी वैद्यकीय सल्ला नक्की घ्यावा)