अमरावती, 15 मार्च (हिं.स.)।
राज्यभरात धुलीवंदनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. बच्चू कडू यांच्याकडून अनोख्या पद्धतीने होळी साजरी करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. बच्चू कडू यांनी धुलीवंदनाच्या निमित्ताने सरकारचे लक्ष वेधण्यासाठी भिंती रंगवत अनोखी होळी साजरी केली आहे. रस्ते रंगवत बच्चू कडूंनी सरकारकडे अनेक मागण्या केल्या आहेत.
शेतकऱ्यांची कर्जमाफी करा, स्वामीनाथन आयोग मान्य करा, शेतकऱ्यांच्या शेत मालाला भाव द्या, पेरणी ते कापणीपर्यंत कामे रोजगार हमी योजनेअंतर्गत करावी. सरकारने दिलेले आश्वासन सरकारने पूर्ण करावे, दिव्यांगांना प्रति महिना सहा हजार रुपये मानधन देण्यात यावे,
घरकुल बांधकाम करण्यासाठी पाच लाख रुपये अनुदान. युवा धोरण पेपर फुटीचा कायदा मंजूर करावा, बांधकाम कामगाराप्रमाणे शेतमजुरांना सुद्धा योजनेचा लाभ द्यावा, शेतमजूर व प्रकल्पग्रस्तांसाठी वित्तीय महामंडळ निर्माण करावे. अशा अनेक मागण्या बच्चू कडू यांच्याकडून करण्यात आल्या आहेत.