हैद्राबाद , 6 मार्च (हिं.स.)।ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नर लवकरच टॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे.डेव्हिड वॉर्नर वेंकी कुडुमुला दिग्दर्शित ‘रॉबिन हूड’ या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात करणार आहे. याची माहिती खुद्द चित्रपटाच्या निर्मात्यानेच एका चित्रपटाच्या प्रमोशनल कार्यक्रमादरम्यान उघड केले आहे.
चित्रपट निर्माता एक वाय रविशंकर यांनी स्वतः याबाबत माहिती दिली आहे.डेव्हिड वॉर्नरला टॉलीवूडमध्ये लाँच केल्याबद्दल निर्मात्याने आनंद व्यक्त केला आणि म्हणाला, “आमच्या ‘रॉबिन हूड’ द्वारे भारतीय चित्रपटसृष्टीत डेव्हिड वॉर्नरला लाँच करताना आम्हाला खूप आनंद होत आहे.” अधिकृत घोषणा होण्यापूर्वी ही बातमी उघड केल्याबद्दल निर्मात्याने दिग्दर्शक वेंकी कुडुमुला यांची माफीही मागितली.
प्रसिद्ध तेलुगू अभिनेता नितीन ‘रॉबिन हुड’ चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. नितीन या चित्रपटात हनी सिंग नावाच्या चोराची भूमिका साकारतो, जो गरिबांना मदत करण्यासाठी श्रीमंतांना लुटतो. चित्रपटाची कथा हनीभोवती फिरते.या अॅक्शनने भरलेल्या मनोरंजक चित्रपटात डेव्हिड वॉर्नर एका छोट्या भूमिकेत दिसणार आहे, त्यामुळे त्याला ऑनस्क्रीन पाहण्यासाठी त्याचे चाहते खूप उत्सुक आहेत.
‘रॉबिन हुड’ हा चित्रपट गेल्या वर्षी पुढे ढकलण्यात आला होता. हा चित्रपट यावर्षी २८ मार्च रोजी प्रदर्शित होणार होता. क्रिकेटर डेव्हिड वॉर्नरमुळे या चित्रपटाची बरीच चर्चा आहे. नवीन येरनेनी आणि वाय रविशंकर निर्मित या चित्रपटात श्रीलीला मुख्य अभिनेत्रीच्या भूमिका आहे. रॉबिन हूडचे संगीत राष्ट्रीय पुरस्कार विजेते संगीत दिग्दर्शक जी.व्ही. प्रकाश कुमार यांनी दिले आहे.