अमरावती, 18 मार्च (हिं.स.)।
औरंगजेबाच्या कबरीच्या वादामुळे नागपूरमध्ये हिंसाचार झाला आहे. दोन गटांमध्ये झालेल्या दगडफेकीनंतर परिसरात तणावपूर्ण परिस्थिती आहे. तर दुसरीकडे अमरावती शहरात देखील यापूर्वी हिंसाचाराची पार्श्वभूमी असल्याने अमरावती शहर पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी स्वतः रस्त्यावर उतरत रात्री उशिरापर्यंत शहरात परिस्थितीचा आढावा घेतला.. तर शहरात ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.
नागपूरमध्ये जे घडलं ते अमरावती शहरात घडू नये यासाठी व कायदा सुव्यवस्था अबाधित यासाठी पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी शहरातील लोकांना शांततेच आवाहन करत कुणीही अफ़वा पसरू नये तर अमरावती शहरात शांतता आहे कुणीही शहरातील शांतता भंग करू नये यासाठी लोकांना पोलिसांनी शांततेचं आवाहन केलं आहे.