अहिल्यानगर, 28 मार्च (हिं.स.)।
मौजे लोणी व्यंकनाथ तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर येथील आदिवासी पारधी समाजाचे अनेक वर्षापासून गायरान जमिनीवरचे अतिक्रमण न हाटवता तेथेच राहून देण्याच्या मागणीसाठी आदिवासी पारधी समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात पुढे म्हटले आहे की,वरील ठिकाणचे रहिवासी असून जातीने आदिवासी पारधी समाजाचे आहे.गेली ५० ते ६० वर्षांपासून गायरान जमीन कसुन खात आहे. त्या जमिनीमध्ये कपाशी,आंब्याचे झाडे,बोर व अनेक झाडे असुन शेती करत आहे.ही गायरान जमीन ९ कुटुंब मिळून कसंत आहे. काही दिवसापूर्वी तेथील ग्रामसेवक सरपंच यांनी मिळून एक सौर प्लांट केला
आणि दुसरा सौर प्लांट करण्यासाठी तेथील अतिक्रमण काढण्यासाठी ग्रामपंचायतीने जाणीवपूर्वक आदिवासी पारधी समाजातील लोकांना वेटीस धरून अतिक्रमण तात्काळ काढण्यासाठी जिल्हाधिकारी,पोलीस अधीक्षक,तहसीलदार,गटविकास अधिकारी,उपविभागीय अधिकारी नगर पारनेर,पोलीस निरीक्षक यांना पत्र देऊन आदिवासी कुटुंबांना बेघर करण्यासाठी षडयंत्र रचले असून तेथील आदिवासी कुटुंब उघड्यावर पडणार असून तेथील अतिक्रमण तात्काळ रद्द करण्यात यावे व ते न झाल्यास बोंबाबोंब आंदोलन करून आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.