मनसेचे मनपा आयुक्त यांना निवेदन
अहिल्यानगर 9 एप्रिल (हिं.स.) :- मनपा क्षेत्रात सर्व हॉस्पिटल व मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल यांचे ऑडिट करण्यात यावे, अशी मागणी मनसेच्या वतीने मनपा आयुक्त यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, नुकत्याच पुणे येथे झालेल्या पंडित दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या हलगर्जी पणामुळे एका गर्भवती महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला.घडले ल्या घटनेला दोषी कोण हे लवकरात तपासातून आपल्या सगळ्यांच्या समोर येईलच. अशी कोणती दुर्दैवी घटना ही आपल्या अहिल्यानगर शहरात घडू नये यासाठी अहिल्या नगर महानगरपालिका क्षेत्रात असणाऱ्या सर्व हॉस्पिटल्स सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल चॅरिटेबल हॉस्पिटल येथे लागू असणारच विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी होत आहे की नाही तिथे येणाऱ्या नागरिकांची कुठल्या प्रकारच्या पिळवणूक तर होत नाही.
याची माहिती घेण्यासाठी पालिके च्या वतीने एक समिती नेमण्यात यावी. व या समितीस काही गैर आढळून आल्यास दोशींवर कडक शासन करण्यात यावे अशी विनंती करण्यात आली आहे.महानगर पालिका क्षेत्रातील सर्व हॉस्पिटल व मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल यांचे ऑडिट करण्यात यावे याबाबत मनसेचे च्या वतीने मनपा उपायुक्त यांना निवेदन देण्यात आले.मनसेचे शहर अध्यक्ष गजेंद्र राशीनकर यांच्या मार्गदर्शनाखाली मनसेचे हे निवेदन देण्यात आले.यावेळी मनसेचे शहर उपाध्यक्ष किरण रोकडे,संकेत पाळंदे,वृषभ साबळे ,प्रतीक कदम,साहिल पगारे,विशाल अरुण आदी उपस्थित होते.