आ. संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली दिले निवेदनअहिल्यानगर, 2 एप्रिल (हिं.स.) : कापड बाजार येथील व्यापाऱ्याच्या मुलीला शनिवारी दिनांक २९ रोजी १० ते १५ गुंडांकडून मारहाण करण्यात आली असून त्या पार्श्वभूमीवर आज आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेत कारवाईची मागणी करत आ. संग्राम जगताप म्हणाले की कापड बाजार येथे पोलीस चौकी उभी करावी, जेणे करून गुंडांवर आळा बसेल, महिलांचे संरक्षण करण्यासाठी आम्ही सक्षम आहोत, पारनेर वरून तो मौलाना येत असून पाठीशी घालण्याचे काम करत आहे.
त्यांना देखील सडेतोड उत्तर दिले जाईल असा इशारा आमदार संग्राम जगताप यांनी दिला. कापड बाजार मधील व्यापाऱ्याच्या मुलीला मारहाण करण्यात आली असून व्यापाऱ्यानी पोलिस अधी क्षकांची भेट घेत निवेदनाद्वारे कारवाईची मागणी केली. यावेळी आमदार संग्राम जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, अमोल गाडे, डॉ. सागर बोरुडे, संतोष ढाकणे, बलदेवसिंग वाही, प्रदीप पंजाबी, महेश मध्यान, राकेश गुप्ता, रंजीदरसिंग चावला, हितेश ओबेराय,विकी मल्होत्रा,परमिंदरसिंग नारंग,अनिल सबलोक आदींसह व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.निवेदनातून पुढे म्हणाले की, एम.जी रोडवर गुरनुरकौर, परमिंदरसिंग नारंग यांचे एम.जी रोडवर कापडाचे दुकान आहे. रस्त्यावर गाडी लावणारे आरोपी नामे आजमत उर्फ अज्जू खॉन दुका नासमोर विनाकारण गर्दी करून त्यांचे दुकानास अडथळा करत असल्याचे सांगितले असता तक्रारदार मुलीची छेडछाड करुन,
शिवीगाळ करून, मारहाण करून तिचा भाऊ स्लोक दिपसिंग यास लोखंडी स्टुलने मारहाण केली. आरोपीचा भाऊ आर्शद आसिफ खॉन, आदनान नदिम शेख, शाहिद पिंजारी यांनी आणि त्यांच्या समाजातील दृष्ट प्रवृत्तीचे लोक जमा करून सदर कुटुंबाला अमानुष मारहाण केली होती. त्यानुसार कोतवाली पोलिस स्टेशन येथे गु.र.नं.०२८९/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ७४,११९(१), इत्यादी प्रमाणे गुन्हादाखल झालेला आहे. सदर आरोपी नेहमीच त्यांचे समाजातील इतर गुंड प्रवृत्तीचे लोकांना जमाव करून नेहमीच व्यापाऱ्यांवर दहशत करतात. त्यांचे समाजातील सर्वच व्यक्ती अशा नाहीत परंतु काही दुष्ट प्रवृत्तीचे लोक दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी जाणुनबुजून दुसऱ्या समाजावर हल्ले करुन दहशत निर्माण करतात. जिथे घटना घडली तो नो हॉकर्स झोन आहे तरीही हे लोक सदर रस्त्यावर जाणुनबुजून अतिक्रमण करुन दुकानासमोर त्यांच्या हातगाड्या लावुन कायमचे दुकान असणाऱ्या व्यापाऱ्यांना शिवीगाळ व दमदाटी करून दहशत करतात.
याकडे पोलिस प्रशासन व म्युनिसिपल कार्पोरेशन नेहमीच डोळेझाक करत आहेत. त्यामुळे या समाजाची दहशत जास्तच वाढत चालली आहे. संपूर्ण एम.जी रोड व घासगल्ली रोड या लोकांनी अतिक्रम ण करून हातगाड्या लावुन जवळ-जवळ वाहतुकीस अडथळा करत आहे. अनेक मोठ्या व्यापाऱ्यांचे जे लाखो करोडोचा टॅक्स भरतात त्यांचे लाखो करोडोचे दुकाने आहेत जाणुन बुजून त्यांचे दुकानासमोर हातगाड्या लावुन त्यांचे दुकान व्यवसायास अडथळा करून, दादागीरी करुन,हमारे आदमी इकठ्ठा करके तुमको मार डालेंगे,अशा धमक्या देऊन दहशत करतात.
सदर ठिकाणी रमजानचा महिना असून देखील व विशिष्ट समाज गर्दी करण्याची संभावना असुन देखील पोलिस प्रशासनाने पोलिस पेट्रोलिंग ठेवलेली नव्हती तसेच पोलिस बंदोबस्तही नव्हता. एवढी मोठी घटना होऊन देखील एकही पोलिस कर्मचारी ताबडतोब तेथे धावुन आला नाही. या अगोदर देखील हातगाडीवर व्यवसाय करणाऱ्या याच समाजाच्या ऐक वर्षापुर्वी अतिक्रमण करुन व्यवसाय करणाऱ्या याच समाजाच्या लोकांनी दिपक नवलानी याचे दुकानात घुसून त्याला चाकुने भोसकून जिवे मारण्याची घटना घडलेली असून देखील प्रशासन जागे झालेले नाही.
सदर समाजाची या एरियामध्ये फार दहशत निर्माण झालेली आहे. त्यांनी सदर रोडवर अतिक्रमण करुन, दादागीरी करुन व्यापाऱ्यांवर भितीचे वातावरण निर्माण केलेले आहे. सदर अतिक्रमण धारकामध्ये बरेच बांगलादेशी नागरीक दिसुन येतात. त्यामुळे त्यांची ओळख पटवणे सुध्दा अशक्य होत आहे. अशा घटनेमुळे दोन समाजात विनाकारण तेढ निर्माण होऊन भविष्यात मोठी घटना घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा गुंड व नंगड प्रवृत्तीच्या लोकांना वेळीच आळा घालण्याची अत्यंत आवश्यकता निर्माण झालेली आहे. त्यामुळे पुढील अनर्थ निश्चितच टळला जाईल असे निवेदनात म्हटले आहे.कापड बाजारातील व्यापाऱ्याच्या मुलीला मारहाण करणाऱ्यावर पोलिसांनी थातूर-मातूर कारवाई केली असल्यामुळे त्यांना लगेच जामीन झाला आहे.
मात्र त्यांनी जर दहशत माजविण्याची कृती केल्यास त्यांना धडा शिकवला जाईल. कापड बाजार परिसर हातगाडी मुक्त केला जाईल, जिल्हाभरातून ग्राहक खरेदीसाठी कापड बाजार मध्ये येत असतात, त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी आमची आहे. दुकानांसमोर हातगाड्याचे अतिक्रमण केले जाते तरी दुकानदारांना आमची विनंती आहे की गाड्या लावू देऊ नका आपल्या मध्ये एकमत असू द्या असे मत आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केले.————————