नायगाव येथे शेती मार्गदर्शन व प्रशिक्षण शिबीर !
Agricultural guidance and training camp at Naigaon!
*आमदार चंद्रकांतभाऊ पाटील यांचे मतदारसंघात कृषी अभ्यासाचे नियोजन.*
महाराष्ट्र शासन कृषी विभाग कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा अंतर्गत सन 2023-24 मध्ये मोजे नायगाव फाटा जवळ श्री भास्कर लक्ष्मण पाटील यांच्या शेतात मार्गदर्शन व प्रशिक्षण शिबिर दिनांक 08/012024 रोजी माननीय आमदार श्री.चंद्रकांत भाऊ पाटील विधानसभा सदस्य मुक्ताईनगर-बोदवड यांच्या अध्यक्षतेखाली केळी निर्यात क्षम उत्पादन व सीएमई व्हायरस या विषयावर प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.
सदर प्रशिक्षणात सर्वप्रथम सूत्रसंचालन आत्मा चे शेतकरी सल्ला समितीचे अध्यक्ष माननीय श्री महेंद्र मोंढाले भाऊ यांनी केले तर नंतर माननीय तालुका कृषी अधिकारी माळी साहेब यांनी उपस्थित शेतकऱ्यांना प्रधानमंत्री खाद्य उन्नयन योजना कीटकनाशक फवारणी करताना घ्यावयाची काळजी असे अनेक कृषी विभागाच्या योजनेबाबत मार्गदर्शन केले.
तर नंतर शेतकऱ्यांना श्री सचिन पाटील डीआरपी जळगाव यांनी प्रधानमंत्री खाद्य वंदन योजना पीएमएफ बाबत केळी प्रक्रिया उद्योग रायपनिंग चेंबर मसाला वर्गीय प्रक्रिया युक्त पदार्थांबरोबर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
कृषी विज्ञान केंद्र ममुराबाद येथील शास्त्रज्ञ श्री किरण मांडवडे सर यांनी उपस्थित शेतकऱ्यांना कृषी पूरक उद्योग बाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
राम बायोटेक चे प्रतिनिधी श्री राजेंद्र पाटील यांनी शेतकऱ्यांना केळी पिकांतील कृषी व सीएम व्हायरस बाबत मार्गदर्शन केले.
या वेळेस कार्यक्रमास श्री महेंद्र मोंढाले आत्मा अध्यक्ष व आत्मा इतर सद्यस्य श्री नवनीत पाटील, नरेंद्र पाटील,श्री भास्कर पाटील श्री जगन्नाथ पाटील श्री प्रवीण महाजन पंढरीनाथ मुलांडे ललित बाविस्कर संतोष पाटील शरद महाजन कृषी विभागातील अधिकारी कर्मचारी श्री अशोक पाटील कृषी पर्यवेक्षक श्री योगेश ठाकरे कृषी सहाय्यक तसेच आत्माचे श्री विनोद सैदाणे व गावातील प्रगतीशील शेतकरी उपस्थित होते.