जळगाव , 12 मार्च (हिं.स.) शहरातील ममुराबाद रोड ते भीलपूरा चौक दरम्यान अवैधपणे आणि निर्दयतेने गोवंशाची वाहतूक करणाऱ्या तीन वाहनांवर शनिपेठ पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत १४ गुरांची सुटका करण्यात आली असून, चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शनिपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांना शहरातून गुरांची अवैध वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यांच्या सूचनेनुसार, गुरुनानक नगर परिसरातील ममुराबाद रोड ते भीलपूरा चौक दरम्यान कारवाई करून तीन पिकअप वाहने जप्त करण्यात आली. , या वाहनांमध्ये गुरांची निर्दयीपणे वाहतूक होत असल्याचे लक्षात आले. पोलिसांनी पिकअप वाहन क्रमांक (एमएच १९ बीएम ३१३५), (एमएच १९ एस ६७७०) आणि (एमएच ४३ बी ०४०९) अशी तीन वाहने जप्त केली आहे. याबाबत पो. कॉ. गिरीश पाटील यांच्या फिर्यादीवरून, वाहन चालक आसीफ मुनव्वर खान सरदार खान कुरेशी (वय ३४), समीर शहा दिलावर शहा (वय २८), शेख मुबारक शेख अखिल (वय २०) आणि दगडू आनंदा साळुंखे (वय ४५) सर्व रा. चोपडा यांच्या विरोधात शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस नाईक विजय निकम करीत आहे.