Thursday, July 3, 2025
Muktai Varta
  • होम
  • मुक्ताई वार्ता
  • जळगाव
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • खेळ
  • व्हायरल
  • मनोरंजन
  • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Muktai Varta
No Result
View All Result

Accident : मुक्ताईनगरात दुचाकी एस टी च्या मागच्या चाकाखाली ! दुचाकी स्वार जागीच ठार तर दुसरा बचावला !

Admin by Admin
October 13, 2023
in मुक्ताई वार्ता
0
Accident : मुक्ताईनगरात दुचाकी एस टी च्या मागच्या चाकाखाली ! दुचाकी स्वार जागीच ठार तर दुसरा बचावला !
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
Accident : मुक्ताईनगरात दुचाकी एस टी च्या मागच्या चाकाखाली ! दुचाकी स्वार जागीच ठार तर दुसरा बचावला !
मुक्ताईनगर :  अवजड वाहन रस्त्याच्या कडेला बेकायदेशीरित्या उभा असल्याने बसला ओव्हरटेक करण्याच्या नादात दुचाकीस्वार बसच्या चाकाखाली आल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी १३ ऑक्टोबर रोजी सायंकाळच्या सुमारास घडली आहे. तर दुचाकी वरील सोबत असलेला एक जण थोडक्यात बचावला आहे. ही घटना मुक्ताईनगर शहरातील संत मुक्ताई महाविद्यालयसमोर घडली आहे. किसन उर्फ कृष्णा तलवारे (वय-३४) रा. बोदवड ता. मुक्ताईनगर ह.मु. इच्छापुर ता. मुक्ताईनगर असे मयत तरूणाचे नाव आहे.
मुक्ताईनगर शहरातून गेलेल्या छत्रपती संभाजीनगर ते   बऱ्हाणपूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या संत मुक्ताबाई महाविद्यालयासमोर एक भिषण अपघात झाला आहे. यावेळी अवजड वाहतूक करणारा ट्रक हा अवैधपणे रस्त्यांच्याकडून जात होता तो बेशिस्त उभा राहिला.दरम्यान याच काळात  मागून येणाऱ्या बस क्रमांक (एमएच १० डीएल ३५५५) ला आव्हरटेक करतांना दुचाकीने किसन तलवारे व सोबत तुळशीराम वानखेडे हे  दोघेजण येथून जात होते. त्यावेळी अचानक दुचाकीवरील ताबा सुटल्याने दुचाकीस्वार हा बसच्या चाकाखाली आल्याने किसन तलवारे या तरूणाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी १३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी घडली. तर सोबत असलेला तुळशीराम वानखेडे थोडक्यात सुदैवाने बचावला आहे. घटनेची माहिती मिळताच मुक्ताईनगर शहरातील स्थानिक पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह उपजिल्हा ग्रामीण रूग्णालयात हलविण्यात आलेला आहे. रात्री उशिरा पर्यंत पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
मुक्ताईनगर शहरात बेशिस्त पार्किंग ठरतेय डोके दुखी
मुक्ताईनगर शहरात , नवीन संत मुक्ताई मंदिर ते बुऱ्हाणपूर रोडवरील मुस्लिम कब्रस्थान तसेच हिंदू स्मशान भूमी पर्यंत तसेच प्रवर्तन चौक ते नवीन कोथळी पर्यंत भर रस्त्यात बेशिस्त वाहनाची पार्किंग, संत मुक्ताबाई महाविद्यालय, शासकीय विश्राम गृह, भारतीय स्टेट बँक, सेंट्रल बँक या रस्त्यावरील तसेच  उपजिल्हा रुग्णालय मुख्य मार्गावरील काही हॉस्पिटल यांनी कुठलीही पार्किंग ची व्यवस्था न केल्याने या ठिकाणी बेशिस्त पार्किंग यामुळे अनेकदा वाहतुकीची कोंडी होत असते. तहसिलरोड वरील हॉस्पिटल समोर तर अनेकदा शासकीय अधिकारीच काय गंभीर रुग्ण असलेल्या रुग्णवाहिकेला देखील अडथळा होत असतो. परंतु याकडे कोणाचेच लक्ष नाही अशाच घटना घडून नाहक अपघातात लोकांचे प्राण जात राहतील परंतु बेशिस्त पार्किंग चा कोणी बंदोबस्त करणार की नाही असा सवाल उपस्थित होत आहे.
Tags: Accident : मुक्ताईनगरात दुचाकी एस टी च्या मागच्या चाकाखाली ! दुचाकी स्वार जागीच ठार तर दुसरा बचावला !Bhusawal NewsJalgaon NewsLatest Marathi NewsMuktai vartaMuktainagar Newsआमदार चंद्रकांत पाटीलमुक्ताई वार्तामुक्ताईनगर
Previous Post

अमिताभ महानायक संघर्ष का बादशाह ; तर  चंद्रकांत पाटील विकास व संघर्षाचे महानायक 

Next Post

Admin

Admin

Next Post

संपादक : संतोष सुपडू मराठे

वार्ता संग्रह

July 2025
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • मुक्ताई वार्ता
  • जळगाव
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • खेळ
  • व्हायरल
  • मनोरंजन
  • लाईफस्टाईल

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group