Entertainment News : ओपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या ह्रदयात स्थान निर्माण करणारा दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतचा (Sushant Singh Rajput) आज म्हणजेच 21 जानेवारीला 37 वा वाढदिवस आहे. 14 जून 2020 रोजी त्याने मुंबईतील फ्लॅटमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. सुशांतचे चाहते आजही ही घटना विसरू शकलेले नाहीत. अशात सुशांतच्या बर्थ अनिवर्सरीनिमित्त बहीण श्वेता आणि प्रियंका यांनी न पाहिलेले व्हिडिओ आणि फोटो शेअर केले आहेत.
श्वेता सिंगने केला व्हिडिओ शेअर
View this post on Instagram
सुशांतची बहीण श्वेता सिंहने एक व्हिडिओ शेअर करत सांगितले की, सुशांतला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. श्वेता म्हणाली, ‘भाईच्या वाढदिवसानिमित्त मला त्यांच्या काही आठवणी सांगायच्या आहेत आणि आम्ही दोघे लहान असताना कसे होतो हे दाखवायचे आहे. श्वेता आणि सुशांत यांच्या वयात फक्त एक वर्षाचा अंतरावर आहे आणि संपूर्ण कुटुंब त्याना ‘गुडिया गुलशन’ म्हणायचे. श्वेता सिंह असेही म्हणाली की, आम्ही एकत्र जेवयचो आणि मिठाईचा आस्वाद घ्यायचो.
यासह श्वेताने सांगितले की, उन्हाळ्याच्या सुटीत जेव्हा सगळे घरात दोघे घरात अभिनय करायचो, आम्ही दोघे आमच्या गॅरेजमध्ये खेळायचो. याशिवाय सुशांतची दुसरी बहीण प्रियांकानेही सुशांतचा जन्म खास बनवण्याचे आवाहन केले आहे. सुशांतच्या बहिणीने ट्विटरवर एक पोस्ट शेअर करून चाहत्यांना तिच्या वाढदिवसानिमित्त डॉग शेल्टरला देणगी देण्याची विनंती केली आहे.
चाहत्यांना अवाहन
This date 11 years back you graced Sid’s n mine Union. Always beside us… still feel You that much around even today, each day, my Eternal Sunshine Sushant but our Trident 🔱 as you called us, is broken! pic.twitter.com/sy91CP8Wso
— Priyanka Singh (@withoutthemind) January 19, 2023
चाहत्यांना अवाहन करत प्रियांकाने सोशल मीडियावर लिहिले आहे की, सुशांतच्या वाढदिवसासाठी तुमचे ड्राफ्ट्स तयार ठेवा. शक्य असल्यास, सुशांत आणि फज (सुशांतचा कुत्रा) यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी तुम्ही 21 जानेवारीला डॉग शेल्टरला भेट देऊ शकता. मी पण जाणार आहे. सुशांतला त्याचा पाळीव कुत्रा फज खूप आवडत होता, फजचा 17 जानेवारीला मृत्यू झाला असल्याचीही माहती त्याच्या बहिणीनेही सोशल मीडियावर दिली आहे.