आमदार चंद्रकांत पाटील यांनी करून दाखवलं..

मुक्ताईनगर येथे कोळी समाजासाठी मल्टी पर्पज हॉल ५० लक्ष निधीसह मंजुर !
मुक्ताईनगर : मुक्ताईनगर तालुक्यातील कोळी समाज बांधवांनी समाजासाठी हक्काचे व्यासपीठ असावे यासाठी कोळी समाज बांधवांनी आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडे मागणी केली होती. या मागणीच्या अनुषंगाने आमदार चंद्रकांत पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केल्याने दि.११ मे २०२२ रोजी जाहीर झालेल्या नगरविकास विभागाच्या शासन निर्णयानुसार मुक्ताईनगर नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्र.१५ मध्ये मल्टी पर्पज हॉल बांधकाम करणे हे काम सुमारें ५० लक्ष रूपये निधीसह मंजूर झाले आहे. यामुळें गेल्या अनेक वर्षंपासून हक्काची वास्तू व्हावी या प्रतीक्षेत असलेल्या तालुक्यातील व शहरातील कोळी समाज बांधवांच प्रतीक्षा संपली असून बांधवांतर्फे आनंद व समाधान व्यक्त होत आहे.
**************
“मुक्ताईनगर शहरात व तालुक्यात मोठ्या संख्येने असलेल्या कोळी समाज , बौद्ध बांधव व मराठा समाज, मुस्लिम समाज बांधवांतर्फे समाजातील गोरगरीब मुला , मुलींचे लग्न कमी खर्चात व्हावे , सामाजिक विवीध कार्यक्रम यासाठी स्वतः च्या हक्काचे सभागृह , सभामंडप असावे अशा स्वरूपात मागण्या केलेल्या आहेत. सर्वांचे बहुद्देशीय उद्देश असल्याचे यासंदर्भात पाठपुरावा सुरू असून सर्वात आधी मुस्लिम समाजासाठी शादी खाना हॉल ९० लक्ष रू. खर्चाचा मंजूर झाला असून त्याची प्रशासकिय मान्यता झाली आहे व काम टेंडर प्रक्रियेत आहे . दरम्यान आज कोळी समाज बांधवांच्या मागणीनुसार ५० लक्ष रू खर्चाचा मल्टी पर्पज हॉल मंजूर झाला असून उर्वरित बौद्ध बांधव व मराठा समाज बांधव यांचे मागणीचीही पूर्तता होणार असून त्यांचेही कामे मंजूरी मार्गावर आहे. असे आमदारांचे स्विय सहायक प्रविण चौधरी यांनी सांगितले.