मुक्ताईनगर जूनेगावाकडे जाणारा मार्गहि होणार दुभाजकासह अद्ययावत रस्ता
मुक्ताईचे भाविक वारकरी व शाळकरी विद्यार्थ्यांचा मुख्य मार्ग असल्याने आमदार चंद्रकांत पाटील यांचा या रस्त्यासाठी विशेष पाठपुरावा सुरू होता या पाठपुराव्याला यश आले आहे.
मुक्ताईनगर : संत मुक्ताई मंदिर (समाधी स्थळ)जुनी कोथळी येथील मुक्ताई मंदिरात शेकडो दिंड्यांचा मार्ग असलेला प्रवर्तन चौक ते जूनेगवतील नागेश्वर मंदिर ते मुक्ताई मंदिर हा मार्ग आहे. त्यातच जे ई स्कूल असेल किंवा मराठी व उर्दू शाळा असतील किंवा आठवडे बाजार याच मार्गावर असल्याने हा रस्ता नेहमी गजबजलेला व दाट रहादरीचा आहे. हा रस्ता केवळ वन वे असल्याने या रस्त्यावर अनेक अपघात घडलेले आहे. तर अनेकांना अपघातात प्राण गमवावे लागले किंवा अपंगत्व प्राप्त करावे लागले . त्यामुळे विशेष करून विद्यार्थी व पालकांसाठी अत्यंत डोकेदुखी ठरलेला हा रस्ता तसेच जूनेगाव व नवीन गाव अशी दुही काळा पासून निर्माण झाली होती. त्यामुळे जूने गावातील व नवीन गावातील रहीवाशांचे नाते जोपासणारा हा रस्ता दूभाजकासह व्हावा ही मागणी व इच्छा आमदार चंद्रकात पाटील यांची अनेक दिवसांपासूनची होती. या रस्त्या संदर्भात त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सतत पाठपुरावा व पत्रव्यवहार केल्याने दि.११ मे २०२२ रोजी नगरविकास विभागातर्फे जाहीर करण्यात आलेल्या शासन निर्णयात “मुक्ताई नगर नगरपंचायत हद्दीतील प्रवर्तन चौक ते जुने बस स्थानक पर्यंत दुभाजकासह रस्ता डांबरीकरण करणे व जुने बस स्थानक ते श्री स्वामी समर्थ केंद्रापर्यंत व राज डेअरी ते जुने मुक्ताई मंदिराजवळील पुलापर्यंत व पुढील रस्ता दुभाजकासह रस्ता काँक्रीटीकरण करणे.” (४५० लक्ष) भरघोस निधीसह मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत असून जूनेगावातील हा मार्ग शहराच्या सुंदरतेत भर घालणार आहे हे विशेष.