निधन वार्ता : स्व.गयाबाई अमृतराव निकम (पाटील) यांचे दुःखद निधन
मुक्ताईनगर : केकत निंभोरा येथील मूळ रहिवासी तथा हल्ली मुक्काम मुक्ताईनगर, शांतीनगर येथील रहिवासी स्व. गयाबाई अमृतराव निकम (पाटील) यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले आहे.
दिनांक १६ ऑक्टोबर २०२५, गुरुवार रोजी रात्री ११:२५ वाजता त्यांनी वयाच्या ८० व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
त्या मुक्ताईनगर येथील प्रसिद्ध सायी डेअरीचे संचालक श्री. सतीश निकम आणि श्री. जगदीश निकम यांच्या मातोश्री होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे.
त्यांची अंत्ययात्रा शुक्रवार, दिनांक १७ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १०:३० वाजता त्यांच्या राहत्या घरून, प्रभाग क्र. १३, शांतीनगर, मुक्ताईनगर येथून निघणार आहे.
निकम परिवारावर कोसळलेल्या या दुःखात आम्ही सहभागी आहोत.
शोकाकुल: निकम परिवार, मुक्ताईनगर आणि केकत निंभोरा.