शेती रस्त्यांच्या दर्जोंन्नतीसाठी आमदार चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षेखाली दि.६ ऑक्टोंबर रावेर, मुक्ताईनगर व बोदवड तालुक्यांची होणार बैठक
मुक्ताईनगर : शेतकरी राजा देशाच्या विकासाचा मुळ घटक आहे. परंतु दरवर्षी अस्मानी,नैसर्गिक संकटे यामुळे त्याचे पार कंबरडे मोडले जाते. यातून संघर्षाची झळ सोसत थोडेफार पीक तो घेत असतो . परंतु शेती रस्ते नसल्याने शेत माल वाहतूकी साठी त्यांची दैना होते वाहतुकीसाठी प्रचंड खर्च येत असल्याने शेतकरी बांधवांची शेती रस्त्याची मागणी मोठ्या प्रमाणावर असते. परंतु या शेती रस्त्यांवर इतर लेखाशिर्ष मधून तरतूद करता येत नसल्याने ही समस्या सोडविण्यासाठी आमदार चंद्रकांत पाटील यांनी पुढाकार घेतला असून शेती रस्त्यांना दर्जोन्नती देवून त्यांचा समावेश ग्रामीण रस्त्यांमध्ये करण्यासाठी एक प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यासाठी प्रशासनाला कामकाजाला लावण्यासाठी त्यांनी पाठपुरावा सुरू केला आहे. यासंदर्भात आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुक्ताईनगर येथे तहसीलदार श्वेता संचेती यांच्या दालनात जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे अभियंते यांची एक महत्त्वपूर्ण बैठक घेतली व दि. ६ ऑक्टोंबर २०२२ गुरुवार रोजी सकाळी ११ वाजता मुक्ताईनगर येथे रावेर , बोदवड व मुक्ताईनगर तालुक्यातील सर्व तहसीलदार, नायब तहसीलदार, तलाठी , मंडळ अधिकारी , तिन्ही पंचायत समिती मधील जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे अभियंते यांची महत्वपूर्ण आढावा बैठक लावण्याच्या सूचना संबंधितांना केल्या आहे.त्यानुसार शेतकरी हिताच्या दृष्टीने होत असलेल्या या बैठकीकडे सर्व शेतकरी बांधवांचे लक्ष लागले आहे.
_____________________________
शेती रस्ते दर्जोंन्नती होऊन ग्रामीण रस्ते नोंद झाल्यास इतर अर्थ संकल्प , आमदार निधी किंवा इतर लेखाशिर्ष मधून करण्यात येतील यामुळे शेतकरी वर्गाला मोठा दिलासा मिळणार आहे.