डोंबिवली, 10 मार्च (हिं.स.)।
प्रतिदिन प्रशिक्षण सुरु असलेल्या पूर्वेतील खंबाळपाडा परिसरातील चौधरीवाडी मैदानात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बालशाखेवर दगडफेक झाल्याची घटना घडली. सुदैवाने कोणीही या घटनेत जखमी झाले नाही. याप्रकरणी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा अध्यक्ष तसेच युवा हिंदुस्तान मुंबई अध्यक्ष रामचंद्र माने यांनी टिळकनगर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमांविरोधात तक्रार दाखल केली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, कचोरे गावात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बालशाखेसमोर लहान मुले प्रशिक्षण घेत असताना अचानक शेजारील जंगल परिसरातून दगडफेक केली. यात सुदैवाने कोणतीही जखमी झाले नाही. या घटनेची माहिती मिळताच भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा अध्यक्ष व युवा हिंदुस्तान मुंबई अध्यक्ष रामचंद्र माने यांनी कार्यकर्त्यांसह या शाखेत धाव घेतली. परिस्थितीचे गंभीर ओळखून माने यांनी पोलीस ठण्यात तक्रार दाखल केली.
यासंदर्भात माने म्हणाले, वीर सावरकर बाल शाखेत दररोज प्रशिक्षण दिले जाते. काही समाजकंटकांनी ही शाखा कशी बंद होईल याकरता दगडफेक केली असा संशय आहे. मी कल्याण परिमंडळ -3 चे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांना निवेदन देऊन दगडफेक करणाऱ्यांना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली आहे. आता सदर ठिकाणी पोलिसांनी बंदोबस्त ठेवला आहे.