अहिल्यानगर, 9 मार्च (हिं.स.)।
लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहरात निळवंडे धरण थेट पाईप लाईनसह अद्यावत इमारती आणि सातत्या ने विकासाच्या योजना यामुळे हे शहर वैभवशाली ठरले आहे.आमदार सत्यजित तांबे यांच्या एक कोटी रुपयांच्या निधीतून संगमनेर शहरात दहा इ टॉयलेट उभारण्यात आले असून सफाई कर्मचारी महिलांच्या हस्ते या टॉयलेटचे लोकार्पण करण्यात आले आमदार सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्यातून नगर विकास विभागाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत एक कोटी रुपयांचा निधी मिळाला होता. यामधून संगमनेर शहरात दहा इ टॉयलेट उभारण्यात आले आहे. मालदाड रोड जय हिंद सर्कल येथे आज या टॉयलेटचा लोकार्पण सफाई कामगार महिला कमल छगन काकडे व माया रतन काकडे या ज्येष्ठ महिलांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी दुर्गा तांबे,प्रमिला अभंग यांसह विविध महिला भगिनी उपस्थित होत्या.
लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर हे अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वात विकसित व वैभवशाली शहर ठरले आहे. सर्वात मोठी बाजारपेठ सुरक्षितता असल्याने नागरिकांची दररोज मोठी वर्दळ या शहरात असते.आले ल्या नागरिकांना टॉयलेटची व्यवस्था व्हावी याकरता आ. सत्यजित तांबे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री यांच्याकडून 30 जानेवारी 2024 रोजी 10 ई टॉयलेट करता एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला होता.या अंतर्गत नवीन नगर रोड, ताजने मळा, मालदाड रोड ,गणेश नगर, सह्याद्री महाविद्यालय, राजपाल कॉम्प्लेक्स या ठिकाणी हे ई टॉयलेट उभारण्यात आले आहे.
महिला सफाई कर्मचाऱ्यांच्या हस्ते या टॉयलेटचा लोकार्पण करण्यात आले. या टॉयलेटमध्ये आत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला असून स्मार्ट सेन्सर तंत्रज्ञान ऑपरेशनसाठी सोलर लाइटिंग सिस्टीम पर्यावरण पूरक ऊर्जा वापरण्यासाठी वॉटर रिसायकलिंग युनिटचा वापर करण्यात आला आहे.अत्यंत स्वच्छ व अत्याधुनिक असलेले हे टॉयलेट नागरिकांसाठी खुले झाले आहे. यामुळे संगमनेर शहरात येणाऱ्या सर्व नागरिक व महिलांची मोठी सोय होणार आहे.या लोकार्पण सोहळ्या प्रसंगी उपस्थित सर्व स्वच्छता कर्मचारी महिला भगिनी यांना राजपाल परिवाराच्यावतीने उन्हाळी स्कार्फ व साड्यांचे वाटपही दुर्गा तांबे व हेमलता राजपाल यांच्या हस्ते करण्यात आले.