जळगाव, 6 मार्च (हिं.स.) आईसोबत चालणाऱ्या चिमुकल्याला दबा धरून बसलेल्या बिबट्याने हल्ला चढवून बालकाला ओढत नेऊन ठार केल्याची धक्कदायक घटना आज घडली . केशा प्रेमा बारेला वय ७ असे चिमुकल्याचे नाव आहे.
जळगाव वन विभागाच्या कार्यक्षेत्रातील यावल येथील पश्चिम वनक्षेत्रपाल सुनील भिलावे यांच्या कार्यक्षेत्रात किनगाव साकळी परिसरात मानकी शिवारात आज ६ मार्च रोजी दुपारी केशा हा आदिवासी मुलगा त्याच्या आईचा हात धरून जात असताना बिबट्याने हल्ला करून आईच्या हातातून केशा प्रेमा बारेला यास फरपटत ओढत नेऊन जखमी केल्याने सात वर्षाचा आदिवासी बालक जागीच ठार झाल्याची घटना घडली . साकळी किनगाव परिसरासह संपूर्ण यावल तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.