अमरावती, 3 मार्च (हिं.स.)
नुकत्याच झालेल्या मराठी साहित्य संमेलनात राजकिय वस्तुस्थिती सांगुन शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या निलम गोऱ्हे यांनी एक वक्तव्य केले होते. परंतु त्या वक्तव्याचा निषेध करतांना शिवसेना ऊबाठाचा शकुनी समजल्या जाणार्या खा. संजय राऊत यांनी निलम गोऱ्हे यांच्यावर खालच्या स्तरावर जाऊन वक्तव्य केले. नमकहराम, नालायक, घाण, अशा प्रकारे शब्द वापरुन चार वेळा आमदार असलेल्या व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विश्वासु असलेल्या निलमताई बद्दल अपशब्द वापरुन समस्त महिलांचा अपमान केला.
त्यामुळे अमरावती इळ्यातील दर्यापूर येथे शिंदे गट शिवसेनेच्या वतीने शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाल पाटिल अरबट यांचे नेतृत्वात दर्यापूर येथिल छत्रपती शिवाजी महाराज चौकात संजय राऊत यांचा निषेध करण्यात आला.
संजय राऊत मुर्दाबाद, निमका पत्ता कडवा है, संजय राऊत भडवा है अशा जोरदार घोषणा देऊन संजय राऊत यांच्या प्रतिमेला चपलानी बदडले व समस्त शिवसैनिकांनी राऊत यांचा निषेध नोंदविला.