नवनीत पाटील : शेती व राजकीय प्रगतीचं गणित साधणारा युवा नेता !
वाढदिवस विशेष लेख
बरेच नेते अतिशय संघर्षातून निर्माण झालेले आपल्याला पाहायला मिळतात त्यांचा राजकीय संघर्ष अतिशय खडतर प्रवासातून होत असतो. परंतु आपण आज अशा युवा नेत्या बद्दल जाणून घेणार आहोत. ज्यांनी राजकीय जीवनात प्रवेश करण्याआधी अतिशय काबाड कष्ट करून शेती कसली , नुसती शेती कसलीच नव्हे तर आधुनिक तंत्रज्ञानाची शेती करून फळ पिक, हळद ,अद्रक सारख्या पिकांतून लाखो रुपयात उत्पन्न घेतले आजही घेत आहेत. त्यांच्या शेती जोपासण्याचा तंत्र आणि शेती तून मिळवलेल उत्पन्न यातून हजारो तरुणांना शेतीतून आर्थिक उन्नती साधता येते हे त्यांनी दाखवून दिले. एक प्रगतिशील युवा शेतकरी म्हणून ते परिचित असून सोबतच समाजसेवेची आवड असलेला हा तरुण शेतकरी मुक्ताईनगर मतदार संघाचे लोकप्रिय आमदार चंद्रकांत पाटील यांचा शिलेदार असून त्यांची पक्ष संघटन कौशल्य पाहून त्यांचेवर मुक्ताईनगर शिवसेना तालुका प्रमुख पदाची धुरा देखील सोपविण्यात आलेली असून एक उत्तम वक्ता असलेल्या या नेत्याचे नाव नवनीत दत्तात्रय पाटील आहे. नवनीत पाटील जसे प्रगतीलशील शेतकरी म्हणून परिचित आहेत त्याच धर्तीवर ते उत्तम व मनमिळावू स्वभावाचे राजकारणी म्हणून देखील परिचित असून दुःखित पीडितांच्या विशेष म्हणजे आदिवासी बहुल भागातील नागरिकांच्या हाकेला धावून जाणारा युवा नेता म्हणून देखील नावारुपास आलेला शिवसेनेचा म्हणून देखील ते परिचित असून त्यांचा आज दि १ जानेवारी २०२५ रोजी वाढदिवस असून अशा हुरहुन्नरी नेत्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !