आई मुक्ताईचे पाईक ह.भ.प. रविंद्र महाराज हरणे यांचा आज 60 वा अभिष्टचिंतन सोहळा…
वारकरी परंपरेचे निस्सीम सेवक, धर्माचरणाचा आदर्श निर्माण करणारे, आणि आई मुक्ताईचे अखंड सेवक, ह.भ.प. रविंद्र महाराज हरणे बाबा यांच्या 60व्या अभिष्टचिंतन सोहळ्याचा प्रसंग हा त्यांच्या कार्याचा गौरव करण्याचा सन्मानाचा क्षण आहे.
श्री क्षेत्र संत आदिशक्ती मुक्ताई संस्थानचे गादीपती, पालखी सोहळ्याचे प्रमुख, आणि वारकरी संप्रदायाचे दीपस्तंभ म्हणून ओळखले जाणारे हरणे महाराज यांनी वारकऱ्यांच्या सेवेत स्वतःला वाहून घेतले आहे. त्यांच्या निस्पृह कीर्तनांनी हजारो लोकांना धर्माच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा दिली आहे.
धर्माचार्य वारकरी भूषण आणि श्री संत मुक्ताई वारकरी फडकरी व किर्तनकार महासंघाचे अध्यक्ष या नात्याने त्यांनी महाराष्ट्रभर कीर्तन-प्रवचनाच्या माध्यमातून वारकरी परंपरेची पताका उंचावत ठेवली आहे. वारकरी सांप्रदायिक संताचे विचार आणि प्रसाराचे कार्य विना मानधनावर अखंडपणे करित आहे. नि:स्वार्थ भाव आणि प्रेमळ वृत्तीमुळे समाजातील प्रत्येक स्तरातील लोक त्यांच्याशी जोडले गेले आहेत. महाराज म्हणजेच मुक्ताई ही आमची भावना आहे .
आज त्यांच्या 60 व्या जन्मदिनानिमित्त आई मुक्ताई चरणी प्रार्थना, की त्यांना उदंड आयुष्य लाभो आणि त्यांचे सेवाकार्य यापुढेही कायम चालू राहो याकरताच मुक्ताई शक्ती प्रदान करो हिच भावना…जय मुक्ताई!