रोहिणी खडसेंना धक्का ! प्रचारात अग्रस्थानी असलेल्या तेली समाजातील युवकांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश !
*मुक्ताईनगर* येथील राष्ट्रवादीचे समर्थक(शरद पवार गट) अजय तळेले, विजु तळेले,सतीश जावरे,सुभाष दैवे,निलेश सापधरे,प्रशांत नाईक,मंगेश खेवलकर यांसह असंख्य तेली समाजातील युवकांनी महाराष्ट्र राज्याचे *मुख्यमंत्री ‘मा.ना.एकनाथ शिंदे साहेब* यांच्या कार्यावर प्रभावित होऊन व विश्वास ठेवून तसेच आ.चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत *शिवसेना* पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला.
सदरील युवक राष्ट्रवादीचे समर्थक(शरद पवार गट) पक्षाचे काम करीत असताना सामाजिक कार्यात अग्रेसर असून तेली समाजासाठी देखील दोन पावले पुढे येवून कार्य करीत असतात. या तरुणांकडे रोहिणी खडसेंच्या प्रचाराची धुरा होती.परंतु शहरात छ्त्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा स्थापन होताच त्यांच्यातील खरा शिव प्रेमी जागा झाला आणि त्यांनी लागलीच आ.चंद्रकांत पाटील यांचं भेट शिवसेनेत जाहीर प्रवेश केला . आणि मुक्ताईनगरचा कायापालट करणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या सोबत उभे राहण्याचा निर्णय घेतला. तसेच चंद्रकांत पाटील यांना जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून आणण्याचा संकल्प केला.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन, उपजिल्हा प्रमुख छोटू भोई, शिवसेना जिल्हा संघटक सुनील पाटील, युवासेना जिल्हाप्रमुख पंकज राणे, शहर प्रमुख गणेश टोंगे , शहर संघटक वसंत भलभले, माजी उपयालुका प्रमुख राजु तळेले, विठ्ठल तळेले, अनिल तळेले, सुभाष धनगर आदींसह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.