छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारणीसह शिवसृष्टीचे काम प्रगती पथावर
मुक्ताईनगर शहरातील प्रवर्तन चौकात तमाम शिवप्रेमींचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारणीचा प्रशासकीय मार्ग मोकळा झालेला असून लवकरच मोठ्या थाटात आणि सन्मानात छत्रपतींचा पुतळा उभारण्यात येणार आहे. चबुतऱ्याचे काम प्रगती पथावर असून अंतिम टप्प्यात आलेले आहे.
मुक्ताईनगर मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी पुढाकार घेऊन जय शंभुराजे बहुउद्देशीय संस्था,मुक्ताईनगर या नोंदणीकृत संस्थेच्या माध्यमातून गेल्या सहा ते सात महिन्यांपासून प्रशासन स्तरावरील सर्व परवानग्यांसाठी पाठपुरावा करून तसेच धुळे येथील शिल्पकार समरद पाटील यांच्याकडे सुमारे 25 ते 30 फूट उंचीचा विशाल काय अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बनविण्याचे काम दिले होते. सदरील प्रसिद्ध शिल्पकाराने गेल्या सहा ते सात महिन्यात दिवस-रात्र काम करून 16 टना पेक्षा जास्त वजनाचा ब्रांझ धातूचा पुतळा बनवून मुक्ताईनगर वासियांचे दिवा स्वप्न प्रत्यक्षात आणण्याचे शिवधनुष्य यशस्वीरित्या हाताळलेले आहे.
*पुतळा व शिवसृष्टीने पर्यटक व शिवप्रेमी होतील आकर्षित* –
दरम्यान आमदार चंद्रकांत पाटील यांचा पाठपुरावा केवळ पुतळ्या पुरताच न थांबता येथे सुमारे चार कोटी रुपये निधीची सुंदर अशी शिवसृष्टी देखील आमदारांच्या सुपीक दूरदृष्टीतून उभारली जाणार असून शिवसृष्टी मध्ये आकर्षण असेल ते स्वागत गेट शिवकालीन वाल कंपाऊंड, सुंदर आसन व्यवस्था, विद्यार्थ्यांना शिवरायांचा आठवावा प्रताप असे ठळक घटना नोंदिसह दिसतील, लॉन, पेव्हर ब्लॉक , मारबल लावून डिझाईन आणि पैठण पॅटर्न म्युझिक फाऊंटन (संगीतावर थरारणारा फवारा) तसेच टुमदार असे शिवाई मंदिर ज्यात तुळजाभवानी विराजमान होणार आहे त्यामुळे हा परिसर छत्रपती शिवरायांच्या आगमनांसह न भूतो न भविष्यती अशा सुशोभिकरणाने शहराच्या सुंदरतेत चार-चांद लावणार आहे.
• अवघ्या काही दिवसात होणार काम पूर्ण
• चबुतऱ्याची लांबी- २५ फुटांपेक्षा उंच
• पुतळ्याची लांबी – २५ फूट उंच
• पुतळ्याची लांबी – १५ फूट रुंद
• पुतळ्याचे वजन – १६ टन (ब्राँझ धातू)
• शिवसृष्टी – ४ कोटी रुपयांच्या निधीतून उभी राहणार न भूतो न भविष्यति शिवसृष्टी
• शिवाई मंदिर : शिवसृष्टी मध्ये (श्री यंत्राच्या आकारातील छोटेसे टुमदार सुंदर मंदिर)
पूर्ण जागेचा नकाशा