Ashadhi Vari Sant Muktai Palkhi ceremony today is the last stop at Ashti
![Simply Easy Learning](https://i0.wp.com/muktaivarta.com/wp-content/uploads/2024/05/Blue-and-White-Modern-We-Are-Hiring-Flyer_20240518_215836_0000.jpg?resize=1600%2C1069)
*आषाढी वारी संत मुक्ताई पालखी सोहळ्याचा आज आष्टी येथे शेवटचा मुक्काम*
_*रविवारी दुपारनंतर पंढरपुरात पोहचणार*
Ashadhi Vari Sant Muktai Palkhi ceremony today is the last stop at Ashti
तापीतीर ते भिमातीर श्रीसंत मुक्ताबाई समाधीस्थळ श्रीक्षेत्र मुक्ताईनगर येथून 18 जूनला प्रस्थान ठेवलेला संत मुक्ताबाई पालखी सोहळा 600 कि.मी.अंतर मजलदरमजल प्रवास करित आज शेवटच्या मुक्कामी आष्टी ता.मोहोळ जि.सोलापूर येथपर्यंत पोहचला आहे तेथून श्रीक्षेत्र पंढरपूर 30 कि.मी. अंतरावर राहीले आहे.त्यामुळे वारकऱ्यांत उत्साहाचे उधाण आले विठूरायाच्या दर्शनाची ओढ तीव्र लागली आहे.
Ashadhi Vari Sant Muktai Palkhi ceremony today is the last stop at Ashti
तत्पूर्वी कालच्या माढा मुक्कामात शहरवासी व्यापारी मंडळींकडून पालखीचे अद्भुतपुर्व स्वागत करण्यात आले होते,ठिकठिकाणी जेसीबी ने पुष्पवृष्टी करण्यात आली होती.
उद्या रोपळे येथील दुपारच्या विसाव्यानंतर संत मुक्ताई पालखी सोहळा पंढरीत दाखल होणार आहे,
Ashadhi Vari Sant Muktai Palkhi ceremony today is the last stop at Ashti
27 दिवसांची भेटीची ओढ तीव्र जाणवत असतांना रोपळे येथील दुपारचा विसाव्यानंतर धावा बोलण्यात येतो
*तुका म्हणे धावा | पंढरी आहे विसावा ||*
धावत धावतच वारकरी श्रीक्षेत्र पंढरपूरकडे निघतात,श्रीक्षेत्र पंढरपूरात प्रवेश करतेवेळी संत शिरोमणी नामदेव महाराज पादूका दिंडी सामोरे येते,संत नामदेव महाराज विद्यमान 17 वे वंशज ह.भ.प. विठ्ठल महाराज नामदास मुक्ताई पालखीचे पूजन करतात,नंतर चंद्रभागेच्या तिरी पालखी सोहळा पोहचतो,तेथे आई मुक्ताईंच्या पादूकांना चंद्रभागा स्नान घालण्यात येते,वारकरी भाविका चंद्रभागेत पहीले स्नान करून व चंद्रभागा आरती करतात,नंतर पालखी सोहळा जुने दगडी पुलावरून भुवैकूठ पंढरपूर येथे मिरवणूकीने दत्त घाटावरील मुक्ताई मठात श्रीक्षेत्र पंढरपूर येथे विसावतो.
Ashadhi Vari Sant Muktai Palkhi ceremony today is the last stop at Ashti
आषाढी पौर्णिममेपर्यंत पालखी सोहळ्याचा मुक्काम मुक्ताई मठ श्रीक्षेत्र पंढरपूर येथे असतो
16 जुलैला वाखरी येथे संत निवृत्तीनाथ,संत ज्ञानदेव,संत सोपान,संत मुक्ताई,संत एकनाथ, संत नामदेव, संत तुकाराम सकळ संतांचा पालखी भेट सोहळा होईल.
Ashadhi Vari Sant Muktai Palkhi ceremony today is the last stop at AshtiÁ