Elon Musk यांच्या दाव्याने नवं वादळ; EVM हॅकिंगबाबत भयानक गौप्यस्फोट
भारतात नुकत्याच 2024 लोकसभा निवडणुका पार पडल्या असून या निवडणुकीत तसेच यापूर्वी EVM मशीनवरुन अगोदरच संभ्रम आहे. या प्रकरणात भारतीय निवडणूक आयोगाला सुद्धा अनेकदा स्पष्टीकरण द्यावे लागलेले आहे. निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना या मुद्यावरुन डिवचल होत.
Muktai Varta Website Home Page
ईव्हीएमविरोधात विरोधक नेहमीच रान उठवत असतात . सर्वोच्च न्यायालयाने EVM च्या बाजूने सुप्रीम निकाल दिल्यानंतरही विरोधकांचे कोणत्याही प्रकारे समाधान झालेले नाही. त्यातच आता Tesla, SpaceX चा सीईओ (CEO )आणि जगातील श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क Elon Musk याने पण EVM बाबत मोठा दावा करून आगीत तेल ओतले आहे.
एलॉन मस्क Elon Musk याने अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार रॉबर्ट एफ केनडी यांच्या युनियर ही पोस्ट शेअर केली आहे. सोशळ मीडिया प्लॅटफॉर्म X वर त्याने ईव्हीएम विषयी भावना व्यक्त केल्या आहेत. “इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन नष्ट करायला हव्यात. या मशीन मानव आणि AI च्या मदतीने हॅक होण्याचा मोठा धोका आहे. हा धोका कमी आहे, पण त्याने मोठी गडबड उडते.”, असे मत त्याने पोस्टमध्ये व्यक्त केले. यामुळे EVM बाबत मोठा बॉम्ब च टाकल्याचे बोलले जात आहे
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार रॉबर्ट एफ केनडी यांची सोशल मीडियावरील एक पोस्ट चर्चेत आली आहे. प्युर्टो रिको येथील निवडणुकीदरम्यान EVM मधील गडबडीविषयी त्यांनी त्यात सविस्तर लिहिलेले आहे. प्युर्टो रिकोच्या प्राथमिक निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनमध्ये अनेक त्रुटी आढळल्या असे त्यात म्हटले आहे.पण हा गोंधळ लागलीच लक्षात आला. त्यानंतर मतदार, मतदान यांचा पडताळणी करण्यात आली. सर्व काही ठीक झाले, असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले होते.
EVM हॅकिंगची भीती
पेपर ट्रेल असल्याने प्युर्टो रिको येथील गडबड पकडल्या गेली. पेपर ट्रेल म्हणजे बॅलेट पेपर, कोणाला मतदान केले याची माहिती देणारा कागद, जो मतदारांच्या हाती असतो. पण ज्या भागात असा पेपर ट्रेल नाही, तिथे अमेरिकन नागरिकांना माहिती पण होणार नाही की त्यांचे मतदान मोजण्यात आले की नाही आणि त्यांनी ज्या उमेदवाराला ते दिले, ते त्यालाच मिळाले? अशी शंका केनडी यांनी व्यक्त केली. त्याला एलॉन मस्क Elon Musk याने X या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म द्वारे उत्तर दिले आहे.