खुशखबर ! 19 जूनपासून पात्र अर्जदारांची होणार पोलीस भरती : पहिल्यांदाच इलेक्ट्रीक तंत्रज्ञानाचा प्रयोग
Alert – Language change facility is available on website for all readers. Accordingly, you can read news in English, Gujarati, Hindi, Punjabi, Marathi, Telugu and Urdu languages
राज्यातील जळगाव जिल्हा पोलीस विभागातर्फे पोलीस भरतीची उर्वरित प्रक्रिया राबविली जात आहे. जिल्ह्यात 137 जागांसाठी प्राप्त अर्जांपैकी सहा हजार 557 अर्जदार पात्र ठरलेले असून या पात्र अर्जदारांची भरती प्रक्रिया 19 जूनपासून होणार आहे. यात प्रामुख्याने शारीरिक चाचण्यांपासून सुरुवात होईल. तर 25 जूनपर्यंत इतर सर्व चाचण्या पूर्ण होतील. यातील उत्तीर्ण उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र ठरणार आहेत. शारिरीक चाचणीच्या अचूक नोंदीसाठी जळगाव जिल्ह्यात पहिल्यांदाच इलेक्ट्रॉनिक्स चीपचा वापर केला जाणार असून त्यामुळे वेळेत थोडी देखील तफावत राहणार नसल्याची माहिती जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
137 जागांसाठी पोलीस भरती
पोलीस भरतीची माहिती देण्यासाठी शनिवारी पोलिस अधीक्षक डॉ. रेड्डी यांच्या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी ते बोलत होते. जिल्ह्यात 137 जागांसाठी पोलीस भरती होऊ घातली असून त्यासाठी येत्या आठवड्यातील बुधवार, 19 जून 2024 पासून शारिरीक चाचण्यांना सुरुवात होणार आहे. त्यासाठी उमेदवारांनी पहाटे साडेचार वाजता पोलीस कवायत मैदान जळगाव येथे हजर रहावे असे आवाहन करण्यात करण्यात आलेले आहे. प्रथम दिनी बुधवारी 19 रोजी 500 पुरुष उमेदवार,
द्वितीय दिवस 20 जून रोजी प्रत्येक दिवशी ते 23 ते एक हजार उमेदवारांना तर 24 रोजी
724 उमेदवारांना चाचणीसाठी बोलविले जाणार आहे. त्यानंतर 25 जून रोजी एक हजार
362 महिला उमेदवार व एक तृतीय पंथीय उमेदवारांची शारिरीक चाचणी होणार असल्याची महत्त्वपूर्ण माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली.
कागदपत्रे छाननीनंतर मिळणार चेस्ट क्रमांक –
प्रत्येक दिवशी आलेल्या उमेदवारांना प्रथम वाहतूक शाखेनजीक बसण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. तेथे अर्ज भरल्यानंतर 50-50 पात्र उमेदवारांना पुढे पाठविले जाईल. तेथे उंची, छाती, छाती फुगवणे यांची मोजणी होईल. त्यात जो उत्तीर्ण होईल, त्यालाच पुढे पाठविले जाणार आहे. त्यानंतर कागदपत्रांची छानणी होऊन मूळ कागदपत्रे (Original Document) जमा करण्यात येणार आहे. तेथून पुढे बायोमेट्रीक फिंगरप्रिंट घेऊन त्यांना चेस्ट क्रमांक दिला जाईल.
भरतीसाठी आमिषांना बळी पडू नये –
पोलीस भरतीची संपूर्ण प्रक्रिया सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या अखत्यारीत केली जाणार आहे. यामध्ये कोणताही मानवी दलाली हस्तक्षेप राहणार नाही. पोलीस भरतीसाठी उमेदवारांना कोणी मदत करणार असल्याचे सांगत असेल तर त्यावर कोणीही विश्वास ठेवू नये व त्यांच्या प्रलोभलांना खोट्या आमिषांना बळी पडू नये, असे आवाहन पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी केले आहे.
भरती प्रक्रियेविषयी काही तक्रार व अडचणी असल्यास त्याचे पहिले अपील उपविभागीय अधिकाऱ्यांकडे करता येईल. त्यानंतर दुसरे अपील पोलीस अधीक्षकांकडे करता येऊ शकते. एकूण अर्जामध्ये 20 टक्के महिलांचा समावेश आहे.
भेट द्या –